राज्यात अनेक जल्ह्यांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस ; नागरिकांना तातडीने मदत पुरविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

165 0

मुंबई : पुणे, सातारा, रायगड, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांच्या काही भागात गेल्या काही दिवसांत झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आवश्यक ती मदत तातडीने पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, रायगड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाला आहे. मुख्य सचिवांसह पुणे, सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी या अतिवृष्टीची माहिती घेतली असून या पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरविण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

ढगफुटीसदृश्य पाऊस झालेल्या गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत पोहोचविण्याच्या सूचना देतानाच मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून नुकसानीची आणि मदतकार्याची माहिती घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Share This News

Related Post

Pune Crime News

Pune Crime News : मुंबई पुणे हायवेवर बनावट दारू जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

Posted by - January 30, 2024 0
पुणे : पुण्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मोठी कारवाई (Pune Crime News) करण्यात आली आहे. जुना मुंबई पुणे हायवेवर राज्य…

“तडफदार नेतृत्व काळाने हिरावले”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली

Posted by - January 3, 2023 0
मुंबई : “नगरसेवक, महापौर ते विधिमंडळातील तडफदार प्रतिनिधी म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवणारे नेतृत्व काळाने हिरावून नेले आहे,” अशा शब्दांत…

पद्मश्री शीतल महाजनचे 5 हजार फुटावरून स्कायडायविंग

Posted by - March 9, 2022 0
जागतिक महिला दिनानिमित्त स्कायडायव्हर पद्मश्री शीतल महाजनने हडपसरच्या पॅराग्लायडिंग सेंटरमधून पॅरामोटर्सच्या साह्याने 5 हजार फुटावरून रात्रीच्या अंधारात स्कायडायव्हिंक केलं. प्रसिद्ध…

Food and Drug Administration : आरोग्यास अपायकारक ‘ पफ वनस्पती ’चा साडेदहा लाख रुपयांचा साठा जप्त

Posted by - August 23, 2022 0
पुणे : अन्न व औषध प्रशासन, पुणे कार्यालयातर्फे आरोग्यास अपायकारक ‘पफ वनस्पती’ विक्रेत्यांवर कारवाई करुन १० लाख ५८ हजार ३८०…
Ajit Pawar

Loksabha Election : नाशिकची जागा राष्ट्रवादीकडेच भुजबळांना मिळणार उमेदवारी

Posted by - April 1, 2024 0
नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) दुसऱ्या सत्रातील निवडुकीसाठीच्या उमेदवारांनी अर्ज भरायला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी महायुती आणि महाविकास…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *