पावसाळी वातावरणात कपडे वाळत नाहीत ; या सोप्या पद्धतीने मिळेल मदत

166 0

आज-काल पाऊस केव्हा सुरू होईल हे सांगतात येत नाही. उन्हाळ्यात पडणारा पाऊस असो किंवा हिवाळ्यात पडणारा पाऊस असो अगदी बारा महिने पाऊस हा कधीही पडू लागला आहे. मोठ्या समस्या सोडा पण गृहिणी समोर सर्वात मोठी समस्या असते की धुतलेले कपडे वाळवायचे कसे ? चला तर मग काही अशा गोष्टी अवलंब करूयात जेणेकरून कपडे चटकन वाळतील, धुतलेले कपडे चांगले राहतील आणि घरात दुर्गंधी देखील पसरणार नाही.

कपडे ओले राहिल्यामुळे कुबट वास घरामध्ये पसरत असतो हे सर्व टाळण्यासाठी हे मुद्दे लक्षात घ्या. प्रामुख्याने पावसाळ्याचे दिवस कोणते हे आपल्याला माहीत असतं, अशावेळी तुम्ही जे कपडे पावसाळ्यात वापरत नाही ते कपडे पॅक करून ठेवून द्या. कपाटांमध्ये त्या कपड्यांची जागा कमी करा.

पावसात भिजले असाल तर ते कपडे लगेच धुण्यासाठी घ्या. साठवून ठेवू नका. पण वापरलेले कपडे जे भिजलेले नाहीत, त्यांना भिजतच घालवू नका. लक्षात घ्या कपडे टप्प्याटप्प्याने धुवायचे आहेत.

See the source image

जर कपडे ओले झाले असतील तरच त्यांना कुबट वास येतो. त्यामुळे अंगावरचे कपडे कोरडे असतील तर भलेही साठवून राहू द्या पण भिजत घालू नका. जिथे पाऊस लागत नाही अशा भागात (रूम मध्ये) कपडे वाळवू शकता. तो एरिया किती मोठा आहे, याचा अंदाज घेऊनच कपडे भिजवा आणि धुवून काढा.

See the source image

कपडे धुवत असताना मशीनमध्ये अर्धे लिंबू पिळून काढा किंवा हाताने कपडे धुणार असाल तर कपडे भिजत घालताना अर्ध लिंबू पिळून कपडे भिजवा यामुळे कपड्यांमधील बॅक्टेरिया नष्ट होईल आणि दुर्गंधी देखील जाईल.

See the source image

पावसाळ्यात बराच वेळा कपडे धुऊन वाळवले जरी असतील तरी ते ओलसरच जाणवतात त्यासाठीच कपाटामध्ये अति कपडे कोंबू नका जे कपडे वापरत नसाल ते दान करा. जे चांगले कपडे आहेत पण पावसाळ्यात वापरत नाही त्यांना लगेचच व्यवस्थित पॅक करून ठेवून द्या. कपाट मोकळे हवेशीर राहू द्या.

पावसाळ्यात कपडे वाळवण्यासाठी पंख्याखाली हमखास वाळवू शकता. या ठिकाणी तुम्ही एखादी धूप किंवा सध्या मिळणाऱ्या कप धूप हा प्रकार अवश्य लावून पहा. त्यामुळे कपड्यांना वास येत नाही. तसेच घरामध्येही वातावरण स्वच्छ आणि सुगंधित राहते.

Share This News

Related Post

पुणे : भोई प्रतिष्ठानच्या वतीने अग्निशमन दलासोबत भाऊबीज साजरी

Posted by - October 27, 2022 0
पुणे : पुण्यातील सुप्रसिद्ध भोई प्रतिष्ठानच्या वतीने अग्निशमन दलाचे जवानांना ओवाळून भाऊबीज साजरी करण्यात आली. यंदा या उपक्रमाचे 27 वे…

Murder Mystery : अपहरण करून खून झालेल्या ‘त्या’ वकिलाचे मारेकरी सापडले

Posted by - January 5, 2023 0
पुणे : अनैतिक संबंधाच्या संशयातून अपहरण करून खून झालेल्या पिंपरी-चिंचवडमधील ‘त्या’ वकिलाच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात आली. 31 डिसेंबर रोजी काळेवाडीतील…

VIDEO : सांगलीत आढळलेल्या ‘त्या’ मगरीचा मृत्यू; मृत्यूचं कारण अस्पष्ट

Posted by - August 18, 2022 0
सांगली : सांगली जिल्ह्यातील नांद्रे – ब्रम्हनाळ नदी काठावर आढळलेली अजस्त्र मगर मृतावस्थेत सापडली आहे. वन विभागाने ती मगर मृत…

18 फेब्रुवारी पासून दहावी चे हॉल तिकीट मिळणार ऑनलाईन. कसे कराल डाऊनलोड ? 

Posted by - February 17, 2022 0
बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढील महिन्यात पार पडणार आहेत. वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा 4 मार्चपासून सुरू होत…

अनेक मुली आज ही शाळेपासून वंचित

Posted by - March 10, 2022 0
सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढून सामाजिक परिवर्तन चळवळीचा पाया घातला. परंतु आजही अनेक मुली शाळेपासून वंचित राहत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *