Talathi Bharti News

Talathi Bharti News : तलाठी भरती घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई; कॉपी पुरवणाऱ्या 4 कर्मचाऱ्यांना अटक

3878 0

छत्रपती संभाजी नगर: तलाठी भरती परीक्षेत (Talathi Bharti News) परीक्षार्थींना उत्तरे पुरवणारे रॅकेट छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणले आहे. परीक्षा घेणाऱ्या टीसीएस या कंपनीच्या दोन कंत्राटी कामगारांनी हाउसकीपिंगचे काम करणाऱ्या महिलेला पैशाची लालच देऊन परीक्षा सुरू असताना परीक्षार्थींना कागदावर उत्तरे लिहून देत उमेदवारांना कॉपी पुरवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत 4 कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चिकलठाणा येथे आय ऑन परीक्षा केंद्राबाहेरून परीक्षार्थी असलेल्या उमेदवारांना उत्तरे पुरवणाऱ्या राजू भीमराव नागरे याला पोलिसांनी अटक केली होती. नागरे याच्या मोबाईलमधून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे, यामध्ये परीक्षा केंद्रावर टीसीएस तर्फे कंत्राटी पर्यवेक्षक म्हणून नेमलेल्या दोन कर्मचाऱ्यांसह एका महिलेचा समावेश या रॅकेटमध्ये असल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी शाहरुख युनूस शेख (वय 27 रा. वैजापूर) पवन सुरेश शिरसाट (वय 26 राहणार सिडको) बाली रमेश हिवराळे (वय 30 रा. ब्रिज वाडी) आणि विकी रोहिदास सोनवणे (वय 30 च रा. चौका) यांना अटक केली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Share This News

Related Post

VIDEO : पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची तृतीयपंथी महिलांच्या हस्ते आरती… पाहा

Posted by - September 3, 2022 0
पुणे : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सव मंडपात मंगलमूर्ती तृतीयपंथी चॅरिटेबल ट्रस्टच्या तृतीयपंथी महिला सदस्यांनी आरती केली. गणेशोत्सव काळात…

उन्हाळ्यात पाळीव प्राण्यांची काळजी कशा प्रकारे घ्यावी

Posted by - March 21, 2022 0
* पाळीव प्राण्यांना पिण्यासाठी भरपूर थंड आणि ताजे पाणी द्यावे * पक्षांना थंड शांत ठिकाणी ठेवावे जिथे त्यांचे निरीक्षण करणे…

समाधानकारक : लंपी संदर्भातील उपाययोजनांमुळे जिल्ह्यात आजार नियंत्रणात; सध्या फक्त ८२७ बाधित जनावरे

Posted by - October 15, 2022 0
पुणे : पशुधनातील लंपी चर्मरोग नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने वेळीच पावले उचलत गतीने १०० टक्के लसीकरण पूर्ण केल्यामुळे जिल्ह्यात हा आजार…

गोरगरीब जनतेच्या आर्थिक उन्नतीसाठी बँकांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Posted by - November 5, 2022 0
पुणे : प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला व्यवसायासाठी निधी उपलब्ध करून देत त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी बँकांनी पुढाकार…

महाराष्ट्राला भरली हुडहुडी : मुंबईचे तापमान सर्वात कमी; तर मराठवाड्यासह विदर्भात देखील थंडीचा कडाका वाढला !

Posted by - December 24, 2022 0
महाराष्ट्र : काही दिवसापासून तापमानात घट होते आहे. खऱ्या अर्थानं आता हिवाळा सुरू झाला, असं वातावरण निर्माण झाल आहे. काही…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *