मालवाहू ट्रकला अपघात; अग्निशमन दलाकडून दोघांची सुटका

976 0

पुणे:  अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मुंबई-बेंगलोर हाइवे, सुस खिंड, महिंद्रा शोरूम समोर दोन मालवाहू ट्रकचा अपघात झाला असून त्यामधे दोन व्यक्ती जखमी अवस्थेत अडकल्या आहेत. त्याचवेळी तातडीने पाषाण अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले.

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले असता, रस्त्यावर कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मुंबईकडून साताराकडे जाणारया मार्गावर मागील बाजूने दुसरया ट्रकने धडक दिल्याने अपघात होऊन वाहनचालक व सोबत असलेला कर्मचारी यांचे दोन्ही पाय पुढे अडकल्याने ते जखमी अवस्थेत होते. त्याचवेळी दलाच्या जवानांनी तत्परतेने अग्निशमन बचाव साहित्याचा (बोल्ड कटर, स्पेडर, डोअर ब्रेकर, कटावणी,रश्शी इत्यादी) वापर करुन सुमारे वीस मिनिटात दोन ही जखमींना बाहेर काढून तातडीने दोन रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात रवाना केले. जखमींच्या पायाला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली असून दत्तू आंबू गोळे, वय ६० व सुरज सुर्वे, वय ३० अशी यांची नावे असून हे सातारा भागातील रहिवाशी असल्याचे समजते.

या कामगिरीत अग्निशमन अधिकारी शिवाजी मेमाणे, वाहनचालक लतेश चौधरी व तांडेल विष्णू राऊत आणि जवान ज्ञानदेव गोडे, अब्दुल पटेल, सुरेश इष्टे तसेच मदतनीस जवान औंकार देशमुख, विकास कुटे यांनी सहभाग घेतला.

 

Share This News

Related Post

Vishal Surendra Agrwal

Pune Porsche Accident : पुणे अपघात प्रकरणात अग्रवाल पिता-पुत्रांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी

Posted by - May 28, 2024 0
पुणे : पुणे हिट अँड रन प्रकरणी (Pune Porsche Accident) विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल या पिता-पुत्रांच्या अडचणीत अजून वाढ…
Beed News

Beed News : गुरुपौर्णिमेच्या दिवशीच ड्युटीवर जाताना दोघा प्राध्यापकांचा जागीच मृत्यू

Posted by - July 4, 2023 0
बीड : बीडमध्ये (Beed News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Beed News) गुरुपौर्णिमेच्या दिवशीच दोन प्राध्यापकांना अपघातात आपला जीव…
Jalgaon News

Jalgaon News : जळगावमध्ये एका महाविद्यालयीन तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

Posted by - June 30, 2023 0
जळगाव : जळगावमध्ये (Jalgaon News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Jalgaon News)रावेर तालुक्यातील वडगाव येथील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तरुणीने…

कंझावाला प्रकरणात आरोपींचा धक्कादायक खुलासा; अंजली गाडीखाली अडकल्याच माहीत होतं ! पण ‘या’ कारणासाठी थांबवली नाही गाडी

Posted by - January 8, 2023 0
नवी दिल्ली : कंझावाला हिट अँड रन प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. 31 डिसेंबरच्या रात्री घडलेला हा भयावह अपघात अद्यापही…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचं दर्शन

Posted by - September 2, 2022 0
पुणे: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *