Srinivasa Prasad

Srinivasa Prasad : भाजपचे माजी केंद्रीय मंत्री व्ही.श्रीनिवास प्रसाद यांचे निधन

1766 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्नाटक चामराजनगरचे भाजपा खासदार व्ही श्रीनिवास प्रसाद (Srinivasa Prasad) यांचे रविवारी मध्यरात्री बंगळुरुतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले आहे. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार व्ही श्रीनिवास प्रसाद यांचे मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे निधन झालं आहे. 22 एप्रिल रोजी त्यांना बंगळुरूतील मणिपाल रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल केले होते.

कोण होते व्ही. श्रीनिवास प्रसाद?
व्ही. श्रीनिवास प्रसाद यांनी 1976 मध्ये जनता पक्षाकडून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. 1979 मध्ये त्यांनी काँग्रेस प्रक्षात प्रवेश केला होता. काही काळ जेडीएस, जेडीयू आणि समता पक्षाचे सदस्य राहिल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून श्रीनिवास यांनी केंद्र सरकारपासून राज्यापर्यंत अनेक महत्त्वाची पदे दीर्घकाळ भूषवली.

1999 ते 2004 दरम्यान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय राज्यमंत्रीपद भूषवल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते 2013 मध्ये आमदार झाले आणि सिद्धरामय्या सरकारमध्ये मंत्री झाले होते. 2016 मध्ये त्यांनी कर्नाटक विधानसभेचा राजीनामा दिल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला. 2017 च्या पोटनिवडणुकीत, त्यांनी भाजपच्या तिकिटावर नंजनगुडमधून निवडणूक लढवल्यानंतर 2019 मध्ये पक्षाने श्रीनिवास यांना चामराजनगरमधून लोकसभा निवडणूक लढवायला लावली आणि ते विजयी झाले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राजकारण सोडण्याची घोषणा केली होती.

 

Share This News

Related Post

पुणे मार्केटयार्डातील आवारात चोरट्यांचा उच्छाद; कांदा, बटाटा, फळांची चोरी

Posted by - March 15, 2022 0
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटयार्डातील बाजार आवारात चोरट्यांनी अक्षरशः उच्छाद मांडलाय. याठिकाणी शेतमालाच्या चोरीच्या घटना सर्रास घडत असून त्याकडे मात्र…

आजपासून 12 ते 14 वयोगटातील मुलांना मिळणार लस, वृद्धांसाठी बूस्टर डोस

Posted by - March 16, 2022 0
नवी दिल्ली- भारतात कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होत असली तरी या महामारीविरुद्धची लढाई सातत्याने सुरू आहे. 12 ते 14 वयोगटातील मुलांनाही…

धुलिवंदनानिमित्त पुणे मार्केटयार्ड शुक्रवारी राहणार बंद

Posted by - March 16, 2022 0
धुलिवंदनानिमित्त मार्केट यार्ड येत्या शुक्रवारी बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र भाजीपाला आणि पान बाजार या दिवशी सुरू राहील असे पुणे…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यातून थेट दिल्लीला रवाना; अधिवेशन सुरू असताना दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Posted by - December 23, 2022 0
नवी दिल्ली : सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनामध्ये रोजच या ना त्या कारणाने वादंग सुरू आहेत. आरोप प्रत्यारोप…
dheeraj-ghate

पुणे शहर भाजपात भाकरी फिरली! धीरज घाटे नवे शहराध्यक्ष

Posted by - July 19, 2023 0
पुणे: आगामी निवडणुकींच्या अनुषंगाने भाजपने पुणे शहर अध्यक्षपदावरून जगदीश मुळीक यांना दूर करून धीरज रामचंद्र घाटे यांची नियुक्ती केली आहे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *