BREAKING : पुण्यातील इंदापूरमध्ये 3500 फूट उंचीवरून कोसळलं कार्गो विमान …

481 0

इंदापूर : पुण्यातील इंदापूर मध्ये एक कार्गो विमान कोसळल्याची घटना मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली आहे. याबाबत मिळालेल्या सविस्तर वृत्तानुसार , सुमारे 3500 फूट उंचीवरून हे विमान कोसळले आहे.

या विमानामध्ये प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे ग्लायडर विमान अक्कलकोट वरून बारामतीला निघाले होते. बारामती मध्ये 1995 सालापासून कार्व्हर एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड ही अकादमी सुरू आहे. यामध्ये एक शिकाऊ महिला उमेदवार भाविका राठोड किरकोळ जखमी झाल्या आहेत.

विमानाचे चालक टायटस यांनी सकाळी दहा वाजता अक्कलकोट होऊन उड्डाण भरले होते. तेथून ते बारामतीच्या दिशेने निघाले असता , इंदापूर मधील बाबर विद्यालयाच्या मागील बाजूस हे विमान कोसळले आहे.

Trainee pilot survives plane crash at Indapur | Pune News - Times of India

दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला असून विमानातील तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला असल्याचे वैमानिक टायटस यांनी सांगितले आहे . तथापि अधिक तपासानंतर हा अपघात नक्की कसा घडला हे स्पष्ट होईल . दरम्यान या घटनेमध्ये प्रशिक्षणार्थी वैमानिक सिद्धार्थ टायटस हे जखमी झाले असल्याचे समजते. त्यांच्यावर रुई या गावांमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर बारामती येथे त्यांना अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे .

अपघाताची माहिती मिळताच बारामती नगरपरिषद आणि भवानीनगर कारखान्याच्या अग्निशमन दलास वर्दी देण्यात आली. बारामती पोलीस अधिकारी आणि विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आहे . या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

Share This News

Related Post

Kirit somayya

भाजप नेते किरीट सोमय्या राज्यपालांची भेट घेणार

Posted by - April 26, 2022 0
मुंबई- मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणणारचं असा निर्धार केलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलीसांनी…
sharad pawar

शरद पवारांचा राजीनामा निवड समितीने फेटाळला; शरद पवार अध्यक्षपदी कायम

Posted by - May 5, 2023 0
पुणे : मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात एक मोठा बदल पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी…

‘जी गोष्ट सन्मानाने झाली असती ती घातपाताने का केली’; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटातील आमदारांना सवाल

Posted by - July 8, 2022 0
मुंबई: ‘जी गोष्ट सन्मानाने झाली असती ती घातपाताने का केली’ असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी…

एनओसी नूतनीकरण परवाना बंधनकारक करा; पुणे महापालिकेनं धाडलं अन्न व औषध प्रशासन विभागाला पत्र

Posted by - March 19, 2023 0
अन्न परवाना नूतनीकरण करण्यासाठी व्यावसायिकांना पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचं ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करावं, असं पत्र महापालिका आयुक्तांनी अन्न…

पुणे पोलीस हायटेक होणार ! सायबर तपासासाठी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग; पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची माहिती

Posted by - December 21, 2022 0
पुणे : राज्यात आणि देशभरात सायबर क्राईमच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगार वेगवेगळी शक्कल लढवून लाखो करोडोंचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *