भारतरत्न लता मंगेशकर-दीदी यांचा सुवर्णांकित पुतळा बद्रिनाथधाम येथील सरस्वती मंदिरात स्थापन करणार!

214 0

पुणे : विश्वशांती केंद्र (आळंदी-देहू) व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे श्री बद्रिनाथधाम, उत्तराखंड जवळील माणा ह्या गावी श्री सरस्वती नदीच्या उगमाजवळ, नरनारायण पर्वताच्या कुशीत, नुकत्याच उभारलेल्या श्री सरस्वती मंदिरात, गानसरस्वती विश्वगानसम्राज्ञी नादब्रह्मयोगिनी भारतरत्न लता मंगेशकर- दीदी यांचा ब्राँझचा सुवर्णांकित पुतळा स्थापित करण्यात येणार आहे.

हा पुतळा, पुणे येथील विश्वराजबागच्या प्रांगणातून एका हृदयस्पर्शी अशा स्वरसुमनांजली अर्पण करणार्‍या अभिवादनपर समारंभाद्वारे, तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज ह्यांची ज्ञानभूमी असलेल्या पुणे येथून, परमपवित्र बद्रिनाथ धामाच्या सान्निध्यात, महर्षि वेदव्यास यांच्या ज्ञानभूमीत, सीमांत गाव माणा येथील केशवप्रयाग येथे, क्रांतिदिन, म्हणजेच मंगळवार दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी १०.१५ वा. विश्वराजबाग, लोणी काळभोर, पुणे येथील श्री विश्वदर्शन देवता मंदिरातून रवाना करण्यात येणार आहे.
या श्री सरस्वती ज्ञान-विज्ञान धामामध्ये विश्वगानसम्राज्ञी भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर यांचा पुतळा स्थापित करण्यात येणार आहे.

या पुतळ्याच्या पाठवणीप्रसंगी आयोजित केलेल्या या ऐतिहासिक कार्यक्रमात भारतरत्न लता मंगेशकर यांचे बंधू ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, गायक पं. उपेन्द्र भट, श्री राहुल देशपांडे, गायिका श्रीमती साधना सरगम, श्री.आदिनाथ मंगेशकर, गायक रविंद्र यादव सहभागी होऊन स्वरसुमनांजली वाहणार आहेत. त्याचवेळी, कवयित्री तत्वदर्शी प्रज्ञावंत वै. उर्मिला विश्वनाथ कराड यांनी शब्दबद्ध केलेल्या अंतिम कवितेचे सादरीकरण संगीतकार गिरीश महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली गायिका श्रृती देशपांडे करणार आहेत.
अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे सल्लागार, ज्येष्ठ कवी आणि मन करारे प्रसन्न या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉ. संजय उपाध्ये यांनी दिली.

विश्वधर्मी डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या हातून जे अनेक लोकोपयोगी कार्यक्रम साकार झाले, त्यामध्ये आळंदी येथे टिकावू व सुंदर घाट, गरुडस्तंभ, रामेश्वर (रूई) येथे भगवान गौतम बुध्द विहार, विश्वधर्मी श्रीराम-रहिम मानवता सेतू आणि तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या नावाने उभारण्यात आलेला जगातील सर्वात मोठा विश्वशांती घुमट यांचा समावेश आहे. या त्यांच्या कार्याचा एक परमोच्च बिंदू म्हणजे उत्तराखंड येथील परमपवित्र बद्रिनाथ धामाजवळ उभारण्यात आलेले श्री सरस्वती ज्ञान-विज्ञान धाम होय!

भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर या पृथ्वीवरील श्री सरस्वतीचेच जणु मूर्त रूप होत्या. ‘संगीत साधनेतून ईश्वरदर्शन आणि शांत रसाची अनुभूती’ ह्या संकल्पनेचा मूर्तिमंत अविष्कार म्हणजे लतादीदी!
जवळजवळ ८० वर्ष आपल्या दैवी स्वराने संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध करणार्‍या श्रीमती लता मंगेशकर यांचं ६ फेब्रुवारी २०२२ रोजी वैकुंठगमन झालं. संगीतक्षेत्रामध्ये खर्‍या अर्थाने कधीच भरून न येणारी ही पोकळी निर्माण झाली. हा शाश्वत सूर हरपल्यामुळे प्रत्येकालाच आपल्या घरातलं कुणीतरी गेलं आहे, अशी भावना दाटून आली. लतादीदींचा प्रत्येक सूर म्हणजे गानदेवी सरस्वतीचा उच्छ्वास होता. देवी शारदेच्या भगिनीसमान असलेल्या लतादीदी परत आपल्या भगिनीगृही गेल्या अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली.

या भावनेचा आदर ठेऊन व ह्याच भावनेचे एक प्रतीकात्मक स्वरूप म्हणून लतादीदींचा एक सुंदर असा सुवर्णांकित ब्राँझचा पुतळा, माणा गाव, बद्रिनाथ, उत्तराखंड येथे एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे नुकत्याच उभारण्यात आलेल्या श्री सरस्वती ज्ञान-विज्ञान मंदिरातील गाभार्‍यात स्थापित करण्यात येणार आहे. त्यामुळे सरस्वती मंदिराच्या ह्या गाभार्‍यात नादब्रह्माचा एक अलौकिक आणि ऐतिहासिक असा आविष्कार निर्माण होणार असून, विश्वशांती व विश्वकल्याणाचा एक वेगळाच संदेश संपूर्ण जगाला दिला जाणार आहे. सदरील हृद्य समारंभानंतर उपस्थित मान्यवर व पाहुण्यांसाठी प्रसादभोजन आयोजित करण्यात आले आहे.

Share This News

Related Post

धक्कादायक:किरकोळ कारणातून अल्पवयीन मुलीची इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

Posted by - July 9, 2022 0
पुणे:हडपसर परिसरातील अमनोरा पार्क सारख्या उच्चभ्रू परिसरातील एका बारावीच्या विद्यार्थिनीने इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस…

Kedar Dighe : शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख झाल्यानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल झालेले केदार दिघे कोण ? (VIDEO)

Posted by - August 4, 2022 0
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी यांनी केदार दिघे यांची ठाणे जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली आणि त्यानंतर अवघ्या तीनच दिवसांनी त्यांच्याविरुद्ध…

१२व्या भारतीय छात्र संसदेच्या दुसर्‍या सत्रात राजस्थानचे विधानसभा अध्यक्ष डॉ.सी पी जोशी यांना आदर्श विधानसभा अध्यक्ष पुरस्कार

Posted by - September 16, 2022 0
पुणे: भारतीय छात्र संसदेच्या माध्यमातून कार्यरत असणारे युवक भविष्यात विधानसभा किवा लोकसभेत प्रतिनिधित्व करू शकतील .या युवकांनी आधुनिक भारत निर्मितीमध्ये…

‘या’ इमारतीच्या बांधकामासाठी मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्याचा काळा पैसा वापरला, किरीट सोमय्या यांचा नवा आरोप

Posted by - April 15, 2022 0
मुंबई- भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्याशी…

निवृत्ती वेतनधारकांनो ! आता घर बसल्या काढा हयातीचा दाखला

Posted by - November 15, 2022 0
पुणे : पुण्यातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सेवानिवृत्त झालेल्या पेन्शन धारकांना आता घरबसल्या हयातीचा दाखला तयार करता येणार आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *