इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग रेफ्रिजरेटिंग एअर कंडिशन इंजिनियर्स (ISHER) संस्थेच्यावतीने जागरुकता परिषद संपन्न..

152 0

पुणे : भारताने २०७० वर्षापर्यंत कार्बन उत्सर्जन शुन्यावर आणण्याचे मिशन हाती घेतले आहे. याबाबतील इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग रेफ्रिजरेटिंग एअर कंडिशन इंजिनियर्स संस्थेने मोलाचा वाटा उचलण्याच्या दृष्टीने जागरुकता अभियान आतापासूनच सुरु केले आहे. यासाठी डिसेंबर २०२२ मध्ये अहमदाबाद येथे रेफ्रिजरेशन आणि शीत साखळी (कोल्ड चेन) संदर्भातील आंतरराष्ट्रीय परिषद व मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्याचीच सुरुवात पुण्यात नुकतीच आंतरराष्ट्रीय प्रदर्शनीचे उद्घाटन आणि जागरुकता परिषदेचे आयोजन करुन करण्यात आली. यापरिषदेला संपूर्ण भारतातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून डेअरी आणि कोल्डस्टोरेज क्षेत्रातील विविध संस्थांचे अध्यक्ष या परिषदेस उपस्थित होते.

इशरेचे पुणे अध्यक्ष विरेंद्र बोराडे म्हणाले की, रेफ्रिजरेटर, कोल्ड स्टोरेज आणि एअर कडींशनिंगची बदलती प्रणालीचा कार्बन उत्सर्जनावर मोठा परिणाम होत आहे. पर्यावरण आणि हवामानबदलात या क्षेत्राचा प्रभाव जास्त आहे. शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी कार्यरत असणारी इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग रेफ्रिजरेटिंग एअर कंडिशन इंजिनियर्स या नामवंत संस्थेच्या पुणे शाखेतर्फे तळागाळातील सर्व लोकांना एअर कंडिशन आणि रेफ्रिजरेशन या क्षेत्राचा वापर करून आपले उत्पादन कसे जास्तीत जास्त काळासाठी उपलब्ध करून देता येईल यावर व्याख्यान आणि जागरूकता अभियानाचे आयोजन केले होते.

चेतन नरके म्हणाले की, देशाच्या सार्वांगिण प्रगतीसाठी अशा प्रकारचे चर्चासत्र, परिषदांचे आयोजन होणे गरजेचे आहे. शेतमाल आणि अन्नधान्याची साठवणूक जास्त काळापर्यंत करण्यासाठी शीतगृहांची आवश्यकता भासते. सध्या २१४ मिलीअन स्केअर फिट कोल्ड स्टोरेज क्षमता आहे. २०२८ पर्यंत यामध्ये ५० टक्क्यांहून अधिक वाढ या क्षेत्रात होणारी आहे. औषध उत्पादन क्षेत्र, कृषी आणि डेअरी क्षेत्रात प्रगती करण्यासाठी या क्षेत्राचे योगदान मोठे आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग रेफ्रिजरेटिंग अँड एअर कंडिशनिंगचे राष्ट्रीय अध्यक्ष स. चंद्रशेखर यावेळी उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून पंकज धारकर, अरविंद सुरंगे, विक्रम मूर्ती, मुकुंद रानडे, रमेश परांजपे, मिहीर सांगवी आणि पुणे शाखेचे अध्यक्ष वीरेंद्र बोराडे तसेच कार्यक्रमाचे संचालक आशुतोष जोशी यावेळी उपस्थित होते.

चिलर कॉन्क्लेव्ह व हिट पंप कार्निवलमध्ये राज्यातील कृषी उत्पादक कंपन्या, रेफ्रिजरेशन आणि कोल्ड चेन शीतगृह व शीत वाहक कंपन्या यामध्ये सहभागी झाल्या होत्या. साऊथ एशियाच्या सर्वात मोठ्या चिलर रेफ्रिजरेशन अँड कोल्ड स्टोरेज या प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.

सायंकाळच्या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून चेतन अरुण नरके अध्यक्ष भारतीय दूध उत्पादक संघ, एस के गोयल निवृत्त विशेष सचिव महाराष्ट्र शासन, राजेंद्र जोग- एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सिंजेंटा फाउंडेशन, कालिदास भांगरे-मॅनेजिंग डायरेक्टर टेस्ट इंडिया, बीबी काळे हेड ऑफ मार्केटिंग इमर्शन, शारंग नातू, उमेश कांबळे, जयंत जोशी अध्यक्ष डी टी ए, अविनाश मंजूल मॅनेजिंग डायरेक्टर किर्लोस्कर डीलर, डॉक्टर रामराजे पाटील हेड ऑफ फार्म कन्सल्टन्सी दे लवाल, लालजी सावला अध्यक्ष नवी मुंबई कोर्ट स्टोरेज मॅन्युफॅक्चरर्स, अशोक डाक सभापती नवी मुंबई, अशोक गोळीबार हेड ऑफ मार्केटिंग उपस्थित होते.

भारतातील सर्वात जुनी आणि अगदी नामांकित अशी इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग रेफ्रिजरेटिंग एअर कंडिशन इंजिनियर्स ही संस्था गेली ४३ वर्षे एयर कंडीशन या क्षेत्रात नाविन्यपूर्ण असे प्रयोग शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य लोकांसाठी करीत आहे यावर्षी ८,९,१० डिसेंबर रोजी अहमदाबाद येथे रेफ्रिजरेशन आणि गोल्ड चेन संदर्भातील आंतरराष्ट्रीय परिषद व मेळावा आयोजित केला आहे त्या अनुषंगाने पुणे शाखेने या रेकॉर्डिंग संदर्भातील जागरूकता अभियान चे आयोजन केले होते.

Share This News

Related Post

धक्कादायक ! मोटारीत बेकायदा गर्भलिंग निदान केंद्र, तिघांविरोधात गुन्हा

Posted by - May 14, 2022 0
पुणे- मोटारीत बेकायदा गर्भलिंग निदान केंद्र चालविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इंदापूर पोलीस आणि वैद्यकीय विभागाने या मोटारीचा पाठलाग…

ऐन दिवाळीत Whatsapp चा ‘सर्व्हर डाऊन’; नेटकरी त्रस्त

Posted by - October 25, 2022 0
जगभरात कोट्यवधी युजर्स असणारं व्हॉट्सअ‍ॅप भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी दुपारी १२च्या सुमारास डाऊन झालं. त्यामुळे जगभरातील युजर्स ट्विटरवर येऊन यासंदर्भात ट्वीट्स…

डीईएस पूर्व प्राथमिक शाळेत ‘गॅझेट फ्री दहीहंडी’ … !

Posted by - August 19, 2022 0
पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस पूर्व प्राथमिक शाळेत ‘गॅझेट फ्री दहीहंडी’चे (खेळांची दहीहंडी) आयोजन करण्यात आले होते. क्रिकेट, व्हॉलिबॉल,…

IMP News : केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर बॉम्ब हल्ला ; संघ कार्यकर्ता जखमी

Posted by - July 12, 2022 0
केरळ : केरळ मधून एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे. मंगळवारी सकाळी केरळ मधील कुन्नूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *