दगडी चाळ २ चा टिझर प्रकाशित, पुन्हा एकदा अरुण गवळी गरजणार ‘चुकीला माफी नाही’ (व्हिडिओ)

335 0

मुंबई – अरुण गवळी म्हणजे मुंबईचा डॉन. अरुण गवळी डॅडी या टोपण नावाने परिचित आहे. अरुण गवळीची दगडी चाळ म्हणजे मुंबईच नाही तर महाराष्ट्रासाठी कुतूहलाचा विषय. २०१५ मध्ये गाजलेल्या दगडी चाळ या मराठी चित्रपटाचा सिक्वल येणार असून त्याचा टिझर नुकताच प्रकाशित झाला आहे.

बॉलिवूड निर्माती संगीता अहिर यांनी ‘दगडी चाळ’च्या निमित्ताने मराठी चित्रपटांच्या निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. पहिल्याच सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला. अरुण गवळीचे व्यक्तिमत्व म्हणजे डोक्यावर गांधी टोपी, पांढरा शुभ्र शर्ट-पायजमा, झुपकेदार मिशा, नजरेत आगीच्या ज्वाला, काटक शरीरयष्टी. पोलिसांसाठी अरुण गवळी हा कुख्यात गुन्हेगार असला तरीही दगडी चाळीसाठी तो रॉबिनहूड आहे.

याचा सिनेमाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून अरुण गवळीच्या भूमिकेत पुन्हा दिसणार आहे अभिनेता मकरंद देशपांडे

नुकतीच सोशल मीडियावर या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ २’ हा सिनेमा येत्या १८ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तुफान कोसळणारा पाऊस आणि अनेक लोकांच्या घोळक्यातून समोर येणारे अरुण गुलाब गवळी म्हणजेच मकरंद देशपांडे यांची दमदार एन्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणार आहे, हे नक्की.

Share This News

Related Post

एमआयटी डब्ल्यूपीयूचे माजी कुलगुरू व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. एस. परशुरामन यांचे निधन

Posted by - September 2, 2022 0
पुणे : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायेन्सेस, मुंबईचे माजी संचालक आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू व थोर शिक्षणतज्ज्ञ…
Mumbai Video

Mumbai Video : देव तारी त्याला कोण मारी ! आधी स्कुटीला धडकला, मग रिक्षाच्या चाकाखाली आला चिमुकला

Posted by - October 1, 2023 0
विरार : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. कधी चालकाच्या स्वत:च्या चुकीमुळे अपघात (Mumbai Video) घडतात, तर कधी दुसऱ्याच्या चुकांमुळे…
Narhari Zhirval

नरहरी झिरवळ यांनी पत्नीला खांद्यावर घेत केला डान्स (Video)

Posted by - May 21, 2023 0
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narahari Ziraval) हे स्पष्टवक्तेपणा आणि साध्या राहणीमानामुळे ओळखले जातात.…

मदर्स डे निमित्त मुलाची आईला अनोखी भेट, आई आणि मुलाने जोडीने केले विमान उड्डाण, पाहा व्हिडिओ

Posted by - May 11, 2022 0
आई आणि मुलाचे नाते याबद्दल कितीही वर्णन केले तरी ते अपुरेच ठरते. आईसाठी आपला मुलगा आणि मुलासाठी आपली आई जिवाच्या…
Kolhapur News

Kolhapur News : रस्त्याने जात असताना अचानक गाढवाचा वृद्ध व्यक्तीवर हल्ला; CCTV आले समोर

Posted by - July 8, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापुरातील (Kolhapur News) गांधीनगरमध्ये एक वेगळी घटना घडली आहे. यामध्ये एका गाढवाने तिघांवर हल्ला करून त्यांना जखमी केले…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *