लठ्ठपणाच्या समस्येवर कोरफड उपयोगी, कोरफडीचे इतरही अनेक फायदे जाणून घ्या

432 0

कोरफड ही एक अशी वनस्पती आहे, जी विविध आजारांमध्ये वापरली जाते. कोरफडीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे आयुर्वेदामध्ये कोरफडीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. लठ्ठपणाच्या समस्येवर कोरफड उपयोगी आहे.

कोरफड ही एक अत्यंत कडू वनस्पती असते. त्यामधून निघणारा गर कडू असल्यामुळे तो तुम्ही तसाच खाऊ शकत नाहीत. तुम्ही थोडासा कोरफडीचा गर हा भाजीमध्ये मिसळू शकता. भाजी तिखट असल्यामुळे तुम्हाला कडू चव लागणार नाही. याचा मुख्य फायदा असा की, असे नियमित केल्यास तुम्हाला पोटाच्या विविध आजारांपासून सुटका मिळू शकते. कोरफडीच्या नियमित सेवनाने पोटाशी संबंधित विविध आजार दूर होतात.

तसेच कोरफडीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म देखील आढळून येत असल्याने कोरफडीचा उपयोग हा हेल्थ ड्रिंकमध्ये देखील केला जातो. तुम्हाला जर लठ्ठपणाची समस्या असेल आणि तुम्ही जर कोरफडीचा नियमित वापर केला तर तुमचे वजन देखील कमी होते.

अशा प्रकारे कोरफडीचे तुम्ही सेवन करू शकता-

भाजीच्या रसात मिसळून- थोडासा कोरफडीचा गर भाजीमध्ये मिसळू शकता. भाजी तिखट असल्यामुळे तुम्हाला कडू चव लागणार नाही. असे नियमित केल्यास तुम्हाला पोटाच्या विविध आजारांपासून सुटका मिळू शकते.

लिंबाच्या रसासह कोरफडीचे सेवन- वजन कमी करण्यासाठी लिंबाचा रस देखील खूप प्रभावी आहे. लिंबूपाणीमध्ये कोरफडीचा रस मिसळल्याने तुमचे वजन लवकर कमी होऊ शकते.

जेवणापूर्वी कोरफडीचा रस प्या- जेवणापूर्वी कोरफडीचा रस प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. जेवणापूर्वी एक चमचा कोरफड खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते, ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी बर्न होऊन, तुमचे वजन देखील कमी होते.

कोमट पाण्यासोबत कोरफडीचे सेवन- चरबी जाळण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी कोमट पाणी सर्वोत्तम मानले जाते. दररोज रिकाम्या पोटी एक किंवा दोन ग्लास कोमट पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. तसेच कोमट पाण्यासोबत कोरफडीचे सेवन केल्यास तुमचे वजन झपाट्याने कमी होते.

मधासोबत कोरफडीचे सेवन- कोरफडीच्या रसामध्ये तुम्ही मधाचे काही थेंब टाकू शकता, ज्यामुळे कोरफडीचा कडूपणा काहीसा कमी होऊ शकतो. मधामध्ये देखील कोरफडीप्रमाणाचे अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. मध आणि कोरफडीचे सेवन नियमित केल्यास तुमचा विविध आजारांपासून बचाव होतो.

(डॉक्टरांचा सल्ला घेऊनच वरील उपाय करावेत )

Share This News

Related Post

” शरद पवारांच्या इशाऱ्यावरूनच संजय राऊत यांनी शिवसेना संपवण्याचा उचलला विडा ! ” शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक आरोप

Posted by - January 16, 2023 0
मुंबई : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली आणि एकनाथ शिंदेंचा हात धरून अनेक नेत्यांनी काढता पाय घेतला. त्यानंतर सातत्याने एकमेकांवर…

विज्ञान आविष्कार नगरी विकसित करण्यासाठी शासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल – शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर

Posted by - September 7, 2022 0
पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेचा विज्ञान आविष्कार नगरी विकसित करण्याचा प्रकल्प स्तुत्य असून याला मूर्त स्वरूप देण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने आवश्यक…

रशियावरील बंदीचा भारतावर परिणाम… ?

Posted by - March 7, 2022 0
युक्रेनवरील हल्ल्यानंतर जगभरातून रशियावर टीका होत आहे.अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांनी रशियावर कठोर निर्बंध लादले आहेत. निर्बंधांमुळे भारत आणि रशिया यांच्यातील…

रेल्वेमध्ये पेट्रोल ओतून प्रवाशांना जिवंत जळणाऱ्या नराधमाच्या रत्नागिरीत आवळल्या मुसक्या

Posted by - April 5, 2023 0
केरळमधील एका ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान, आग लावून ३ प्रवाशांना जिवंत जाळण्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात यश…

शिंदे गटात प्रवेश करताच गजानन किर्तीकरांची शिवसेना नेते पदावरून हकालपट्टी

Posted by - November 11, 2022 0
मुंबई: शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर अखेर शिंदे गटात दाखल होणार असून यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याचे चित्र पाहायला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *