रिपाइं’च्या महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी ॲड. अर्चिता जोशी यांची नियुक्ती

147 0

पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी ॲड. अर्चिता मंदार जोशी यांची नियुक्ती करण्यात आली. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व ‘रिपाइं’चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले व महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सीमा आठवले यांच्या हस्ते ॲड. अर्चिता मंदार जोशी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. तसेच त्यांचा रामदास आठवले व सीमा आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

नुकत्याच झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत महिला प्रदेश अध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. ॲड अर्चिता मंदार जोशी या पुणे बार असोसिएशनच्या विद्यमान सदस्य असून, अनेक संस्थांमध्ये कायदेशीर सल्लागार म्हणून त्या कार्यरत आहेत. तसेच अखिल महाराष्ट्रीय ब्राह्मण महासंघाच्या कार्याध्यक्षा आहेत.महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या कायम अग्रेसर आहेत.

सर्व समाजाच्या महिलांना सोबत घेऊन त्यांचे प्रश्न सोडविण्याचा व कायदेशीर मार्गाने महिलांवरील अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे तसेच ‘रिपाइं’ पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे ॲड अर्चिता मंदार जोशी यांनी सांगितले.

Share This News

Related Post

NCP

NCP : राष्ट्रवादी कुणाची? निवडणूक आयोगाकडे शरद पवार गटाने केला ‘हा’ मोठा दावा

Posted by - November 9, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागच्या काही वर्षांमध्ये राज्यात मोठया घडामोडी पाहायला मिळत आहेत. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी (NCP) पक्षामध्ये मोठी फूट…

सुधीर तांबे यांनी काँग्रेसला फसवलं ! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे परखड भाष्य म्हणाले, काँग्रेस सत्यजितला पाठिंबा देणार नाही…

Posted by - January 13, 2023 0
नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. काँग्रेस पक्षाने सुधीर तांबे यांना नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी…

कात्रज डेअरीच्या अध्यक्षपदी केशर पवार तर उपाध्यक्षपदी राहुल दिवेकर बिनविरोध

Posted by - April 4, 2022 0
पुणे- पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाची सन 2022-2027 च्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी महिला…
Congress

Lok Sabha Election : काँग्रेसकडून लोकसभेसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर

Posted by - March 24, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. या यादीत 46 उमेदवारांची…

गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात

Posted by - December 8, 2022 0
राजकीय दृष्ट्या आजचा दिवस महत्त्वाचा असून गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभांच्या निवडणुकांच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *