पुणे -मुंबई महामार्गावर तळेगावजवळ पिकअप-ट्रकचा अपघात, महामार्गावर केळीच केळी

227 0

तळेगाव- जुन्या पुणे -मुंबई महामार्गावर तळेगाव दाभाडे जवळ पुण्यावरून मुंबईकडे केळी घेऊन जाणाऱ्या पिकअप टेम्पोने समोरून जाणाऱ्या ट्रकला धडक दिली. या अपघातानंतर महामार्गावर केळीच केळी विखुरली गेली. सुदैवाने या अपघातात कोणीही जीवितहानी झाली नाही.

हा अपघात आज सकाळी झाला. पुण्यावरून मुंबईकडे केळी घेऊन जाणारा पिकअप टेम्पो (एम एच ४५ ए एफ ६२३३) चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे समोरून जाणाऱ्या ट्रक वर धडकला. या अपघातानंतर महामार्गावर केळ्यांचा अक्षरशः खच पडला. या केळ्यांवरून वाहने घसरण्याची भीती असल्याने दुसरी कोणत्याही समस्या निर्माण होऊ नये. यासाठी तळेगांव दाभाडे पोलिसांनी प्रसंगावधान राखत आय आर बी देवदूत रेस्क्यूला पाचारण केले. अपघाताचे ठिकाण स्वच्छ करण्यात आले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

Share This News

Related Post

जागतिक महिला दिनानिमित्त महापालिकेत महिलांची शाहिरीतून मानवंदना

Posted by - March 8, 2022 0
आज 8 मार्च जागतिक महिला दिन.या दिवसाचं औचित्य साधत आज महिला शाहीरांनी छत्रपती शिवरायांना शाहिरीतून मानवंदना वाहिली आहे. जागतिक महिला…

Shinde-Fadnavis Government : सरपंच निवड आता जनताच करणार ; विधानसभेत विधेयक मंजूर

Posted by - August 17, 2022 0
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली . मंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा विधेयक आज विधानसभेत…

पीएमपीएमएलची सेवा भविष्यात खंडित होणार नाही; पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी घेतली पीएमपीएमएल अधिकारी आणि ठेकेदारांची एकत्रित बैठक

Posted by - March 12, 2023 0
पुणे देशातील सर्वात जलदगतीने विकसीत होणारे शहर आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील प्रमुख असलेल्या पीएमपीएमएलची वाहतूक व्यवस्था भविष्यात खंडित होणार…

महाराष्ट्रातील चार मान्यवरांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान

Posted by - March 29, 2022 0
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. राष्ट्रपतींच्या हस्ते…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *