WPL 2024 Auction

WPL 2024 Auction : आज पार पडणार महिला प्रीमियर लीग 2024 चा लिलाव; ‘या’ खेळाडूंवर असणार सगळ्यांची नजर

549 0

मुंबई : यंदा महिला प्रीमियर लीगचा (WPL 2024 Auction) दुसरा सिझन आहे. या हंगामाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत. वूमेंस आयपीएलच्या दुसऱ्या सीझनसाठी म्हणजेच WPL 2024 साठी आज लिलाव पार पडणार आहे. आज 9 डिसेंबर रोजी मुंबईत महिला प्रीमियर लीग 2024 साठी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. हा लिलाव मुंबईमध्ये पार पडणार आहे.

आज होणाऱ्या लिलावामध्ये पाच संघ एकूण 17.65 कोटी रुपयांची खरेदी करणार आहेत. हे संघ जास्तीत जास्त 30 खेळाडू खरेदी करू शकतात. वूमन्स आयपीएल लिलावापूर्वी संघांनी अनेक खेळाडूंना सोडलं आहेत.त्यांना आजच्या लिलावात मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. वूमेन्स प्रीमियर लीग ऑक्शन 9 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 2.30 वाजता मुंबईमध्ये पार पडणार आहे.

कुठे पाहणार हा लिलाव?
भारतात महिला प्रीमियर लीगचा लिलाव स्पोर्ट्स 18 आणि स्पोर्ट्स 18 एचडी चॅनेलवर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच Jio Cinema अ‍ॅप किंवा वेबसाइटवर WPL खेळाडूंचा लिलाव ऑनलाइन पाहू शकतात.

एकूण 165 खेळाडूंवर लागणार बोली
महिला प्रीमियर लीग 2024 च्या आजच्या लिलावात पाच संघ एकूण 165 खेळाडूंवर बोली लावतील. यामध्ये 104 भारतीय खेळाडू आणि 61 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.

‘या’ खेळाडूंवर असणार सगळ्यांची नजर
या लिलावासाठी निवडलेल्या 61 परदेशी खेळाडूंमध्ये श्रीलंकेची चमारी अटापट्टू, वेस्ट इंडिजची डिआंड्रा डॉटिन आणि दक्षिण आफ्रिकेची शबनम इस्माईल यांच्यावर सगळ्यांची नजर असणार आहे. तर मानसी जोशी आणि देविका वैद्य या दोन खेळाडूंवर सगळ्यांची नजर असणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

NIA Raid : मुंबई, पुणे, ठाणे या ठिकाणी NIA ची छापेमारी; ISIS शी संबंधित 13 जणांना अटक

Raigad News : रायगड पोलिसांची मोठी कारवाई ! 106 कोटींचे ड्रग्स जप्त

Robbery News : दर 2 वर्षांनी महाराष्ट्रातील ‘या’ बँक शाखेत पडतो दरोडा

Pune NIA Raid : इसिस मॉड्युल प्रकरणात NIA ची पुण्यात मोठी कारवाई; 3 जणांना अटक

Wife Murder : धक्कादायक ! दारूसाठी पैसे न दिल्याने पतीकडून पत्नीची हत्या

Share This News

Related Post

Shivrayancha Chhava

Shivrayancha Chhava :‘शिवरायांचा छावा’ने इतिहास रचला! टाईम्स स्क्वेअरवर पोस्टर झळकणारा पहिला मराठी चित्रपट ठरला

Posted by - October 12, 2023 0
मुंबई : ‘शिवरायांचा छावा’ (Shivrayancha Chhava) या आगामी मराठी चित्रपटाने न्यूयॉर्कमधील जगप्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरवर या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज़ करुन…
Raj Thackeray

Raj Thackeray : अजित पवारांच्या बंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - July 2, 2023 0
मुंबई : आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकिय भूकंप पाहायला मिळाला. यावेळी शिवसेनेनंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. यामध्ये…
Maharashtra Politics

Maharashtra Politics : महाविकास आघाडी एकत्रच ! पवार, ठाकरे आणि काँग्रेस नेते एकत्र करणार महाराष्ट्र दौरा

Posted by - July 4, 2023 0
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीशी बंड करत, उपमुख्यमंत्री पदाची (Maharashtra Politics) शपथ घेतली. त्यांच्या समवेत राष्ट्रवादीच्या 9…
Mumbai Airport Shut

Mumbai Airport Shut : मोठी बातमी! मुंबई विमानतळ 6 तासांसाठी राहणार बंद

Posted by - October 16, 2023 0
मुंबई : मुंबई विमानतळावरून (Mumbai Airport Shut) प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतररष्ट्रीय…
Ellyse Perry

Ellyse Perry : एलिस पेरीने रचला इतिहास ! ‘ही’ कामगिरी करणारी ठरली पहिलीच महिला क्रिकेटपटू

Posted by - March 13, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महिलांच्या प्रिमीअर लिग 2024 मध्ये मुंबईविरूद्ध बंगळूरूच्या सामन्यात RCB ने बाजी मारून प्लेऑफमध्ये आपली जागा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *