Shreyanka Patil

Shreyanka Patil : श्रेयंका पाटीलने रचला इतिहास, WCPL मध्ये खेळणारी ठरली पहिली भारतीय

1325 0

मुंबई : वूमन्स एमर्जिंग अंडर 23 आशिया कपमध्ये टीम इंडियाच्या श्रेयांका पाटीलने (Shreyanka Patil) आपल्या खेळीने सगळ्यांनाच प्रभावित केले होते. या खेळीचे तिला आता फळ मिळाले आहे. श्रेयांकाची (Shreyanka Patil) नुकतीच वूमन्स कॅरेबियन प्रीमिअर लीग स्पर्धेत निवड झाली आहे. श्रेयांका यासह या स्पर्धेत खेळणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. ही वूमन्स कॅरेबियन प्रीमिअर लीग 31 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. श्रेयांका या स्पर्धेत गयाना अमेजन वॉरियर्स टीमकडून खेळणार आहे. श्रेयांका परदेशी टी 20 लीगमध्ये खेळण्याची संधी मिळवणारी पहिलीच अनकॅप्ड भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

या स्पर्धेत श्रेयांका विंडिज माजी कर्णधार स्टेफनी टेलर हीच्या नेतृत्वात खेळणार आहे. वूमन्स कॅरेबियन प्रीमिअर लीग स्पर्धेचं यंदाचे हे दुसरं पर्व आहे. या स्पर्धेतील पहिल्या हंगामात फायनलसह एकूण 4 सामने खेळवण्यात आले होते. तर यंदाच्या सीझनमध्ये सामन्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. नुकताच काही दिवसांपूर्वी टीम इंडियाने वूमन्स एमर्जिंग अंडर 23 आशिया कप जिंकला होता.

या स्पर्धेतील कामगिरीसाठी श्रेयांकाला ‘प्लेअर ऑफ द सीरिज’ हा पुरस्कार देण्यात आला आहे. श्रेयांका (Shreyanka Patil) टीम इंडियाचा स्टार बॅट्समन विराट कोहली याला आपला आदर्श मानते असे तिने एका मुलाखतीमध्ये म्हंटले आहे.

Share This News

Related Post

raj-thackeray

Raj Thackeray : राज ठाकरेंचा महायुतीच्या बॅनरवरील फोटो पाहून मनसैनिकांनी केली ‘ही’ मागणी

Posted by - April 13, 2024 0
मुंबई : गुढीपाडव्याच्या पक्ष मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर राज…
Rohan Bopanna-Rutuja Bhosale

Asian Games 2023 : रोहन बोपण्णा- ऋतुजा भोसले यांनी रचला इतिहास; टेनिस मिश्र दुहेरीत पटकावले सुवर्णपदक

Posted by - September 30, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) सातव्या दिवशी भारताला सुवर्णपदक मिळाले आहे. रोहन बोपन्ना आणि…
Viral Dance Video

Viral Dance Video : सोनाली कुलकर्णी-फुलवा खामकर यांनी भर पावसात गारवा गाण्यावर केला डान्स

Posted by - July 19, 2023 0
मुंबई : सध्या राज्यात सगळीकडे जोरदार पाऊस सुरु आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात पावसाचे एक वेगळे स्थान असते. अनेकजण या पावसाचा मनमुराद…
Disha Vakani

Disha Vakani : तब्बल 5 वर्षांनंतर चाहत्यांसमोर आली दया बेन! ओळखणेदेखील झाले कठीण

Posted by - July 26, 2023 0
मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. मागच्या काही दिवसांपासून ही मालिका…
Pandhari Sheth

Pandhari Sheth Phadke : बैलगाडा शर्यतींचा बेताज बादशाह पंढरीशेठ फडके यांचे निधन

Posted by - February 21, 2024 0
मुंबई : पंढरीशेठ फडके (Pandhari Sheth Phadke) विहिघरवाला, बिनजोड छकडेवाला… या गाण्याप्रमाणे रायगडसह संपूर्ण महाराष्टाभर आपले नाव करणारा बैलगाडा शर्यतींचा बेताज बादशाह…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *