India Vs NewZeland

World Cup 2023 : ठरलं.. पहिली सेमीफायनल भारत विरुद्ध न्यूझीलंड! कधी, कुठे होणार मॅच?

697 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तान आणि इंग्लंडदरम्यानच्या सामन्यामध्ये (World Cup 2023) नशिबानचे पाकिस्तानची साथ दिली नाही. सामन्यातील टॉस हा अत्यंत महत्त्वपूर्ण होता. मात्र इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरने नाणेफेक जिंकल्यानंतर खेळपट्टीवर हिरवळ अधिक असतानाही प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि पाकिस्तानची सेमी फायनलमध्ये जाण्याची आशा धुसर झाली. त्यामुळे आता पाकिस्तान सामना जिंकला तरी नेट रन रेटच्या जोरावर त्यांना न्यूझीलंडच्या वरचढ होता येणार नाही. त्यामुळे आता भारत आणि चौथ्या स्थानवर असलेल्या न्यूझीलंडविरुद्ध भारताचा सामना होणार हे अगदी निश्चित झालं आहे.

पाकिस्तानी संघ सेमी-फायलनमध्ये पात्र ठरण्याची शक्यता अगदी 0.01 टक्के होती. मात्र टॉस जिंकून जॉस बटलरने प्रथम फंलदाजीचा निर्णय घेणे आणि त्यानंतर इंग्लडचे सलामीवीर जॉनी बेस्ट्रो आणि डेव्हिड मिलान यांनी केलेल्या तुफानी खेळीमुळे पाकिस्तानचा सेमी-फायनलमधील पत्ता कट झाला आहे. आता इंग्लंड प्रथम फलंदाजी करताना जो काही स्कोअर करेल ते टार्गेट पाकिस्तानला अशक्य वाटेल अशा रनरेटने पूर्ण करावं लागेल. म्हणजे पहिल्या 10 ओव्हरनंतरची स्थिती पाहिल्यास इंग्लंडने पाकिस्तानला 300 धावांचं टार्गेट दिल्यास ते केवळ 6.1 ओव्हरमध्ये पूर्ण करावं लागेल. हे समीकरण प्रत्यक्षात अशक्य आहे. म्हणजेच पाकिस्तान सामना जिंकला तरी नेट रन रेटच्या दृष्टीने न्यूझीलंडच्या मागेच राहणार आहे.

साखळी सामन्यातील एक सामना बाकी राहिला आहे. भारताचा नेदरलॅण्डविरुद्धचा सामना शिल्लक राहिला आहे. हा सामना भारत सहज जिंकेल असे वाटत आहे. या सामन्याचा निकाल काहीही लागला तरी भारत पॉइण्ट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी राहणार असल्याने भारत आणि न्यूझीलंडमध्ये पहिली सेमी-फायनल होणार हे निश्चित आहे.

भारत – न्यूझीलंड कधी आणि कुठे रंगणार सामना ?
भारत आणि न्यूझीलंडमध्ये 15 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडेच्या मैदानावर सेमी-फायनलचा सामना होणार आहे. आतापर्यंतच्या आयसीसीच्या सेमी-फायलन आणि फायलनच्या सामन्यांमध्ये कायमच न्यूझीलंडने भारताला पराभूत केलं आहे. मात्र यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारताने तब्बल 21 वर्षानंतर न्यूझीलंडला वर्ल्ड कप स्पर्धेत पराभूत करत इतिहासाची पुनरावृत्ती टाळली आहे. विशेष म्हणजे भारत या स्पर्धेत अजूनही अपराजित आहे. या दोन्ही संघांमध्ये कडवी लढत पाहायला मिळणार आहे.

दुसरा सामना कोणामध्ये आणि कधी?
सेमी-फायनलचा दुसरा सामना दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी असलेल्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियादरम्यान होणार आहे. हा सामना 16 नोव्हेंबर रोजी कोलकात्यामधील ईडन गार्डन्सच्या मैदानावर होणार आहे. या दोन्ही सामन्यांमधील विजेते संघ 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना खेळतील.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Related Post

Rohit Sharma

IPL 2024 : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का ! रोहित शर्माच्या ‘या’ हुकमी एक्क्याला झाला ‘तो’ आजार

Posted by - January 8, 2024 0
मुंबई : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या टी-ट्वेंटी मालिकेसाठी (IPL 2024) काल टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. या मालिकेत…
Quinton de Kock

South Africa News : वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर होताच डावखुऱ्या ओपनरची वन डे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

Posted by - September 5, 2023 0
भारतीय संघापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेनेही (South Africa News) वर्ल्ड कप स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. टेम्बा बवुमाच्या नेतृत्वाखाली हा संघ…
virender sehwag

ICC Hall of Fame : सेहवागसह ‘या’ 3 दिग्गजांचा ICCच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश

Posted by - November 13, 2023 0
मुंबई : आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये (ICC,Hall of Fame) तीन दिग्गज क्रिकेटर्सचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये भारताचा माजी सलामीवीर…

पल्लवी मावळे यांची हॅटट्रिक, थाळीफेकमध्ये सुवर्ण तर गोळाफेक आणि भालाफेकमध्ये रौप्यपदक

Posted by - May 27, 2022 0
पुणे- नुकत्याच पॉण्डेचरी येथे झालेल्या नॅशनल मास्टर्स ऍथलेटिक्स २०२२ स्पर्धेमध्ये पुण्याच्या पल्लवी मावळे यांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. त्यांनी थाळीफेकमध्ये…
PCB

Babar Azam : बाबर आझमने कर्णधारपदाचा राजीनामा देताच पाकिस्तानने ‘या’ दोन खेळाडूंची केली कर्णधारपदी निवड

Posted by - November 16, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तानच्या खराब कामगिरीनंतर बाबर आझमने (Babar Azam) कर्णधारपदाचा राजीनामा दिला. यानंतर आता पीसीबीने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *