Pune Cricket

World cup 2023 : भारत-बांगलादेश मॅचवर पावसाचं सावट? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

580 0

पुणे : आयसीसी वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप 2023 (World cup 2023) स्पर्धेतील 17 वी मॅच भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये गुरुवारी, 19 ऑक्टोबर 2023 रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील स्टेडियमवर होणार आहे. या मैदानावर 9 महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय मॅच खेळवली जात आहे. या वर्षी जानेवारीमध्ये पुण्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात टी-20 मॅच झाली होती, ज्यामध्ये श्रीलंकेने भारताचा 16 धावांनी पराभव केला होता.

तसेच बांगलादेशची टीम 25 वर्षांनंतर भारतात भारतीय क्रिकेट टीमविरुद्ध वन-डे खेळणार आहे. भारतामध्ये 1998 मध्ये बांगलादेश आणि भारत यांच्यात शेवटची मॅच मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आली होती.

कसे असेल हवामान?
बुधवारी, 18 ऑक्टोबर 2023 रोजी भारत व बांगलादेश क्रिकेट टीमने एमसीए स्टेडियमवर सराव केला. या वेळी मात्र हलक्या पावसानं हजेरी लावली. त्यामुळे ग्राउंड स्टाफला मुख्य खेळपट्टी कव्हर करावी लागली. बुधवारी हलका रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज स्थानिक हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. मॅचच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी पुण्यामध्ये पावसाची शक्यता नाही. दिवसा तापमान 32 अंशांपर्यंत राहू शकतं असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसाची शक्यता 1 ते 4 टक्के आहे. त्यामुळे पाऊस पडला तरी मॅचवर याचा काही जास्त परिणाम होणार नाही.

भारत- रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रविंद्र जड़ेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह और मोहम्मद सिराज

बांग्लादेश- लिटन दास, तंजीद हसन, मेहदी हसन मिराज, नजमुल हुसैन शान्तो, शाकिब अल हसन (कॅप्टन), मुशिफिकुर रहीम (विकेटकीपर), तौहीद हृदोय, महमुदुल्लाह, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान और शोरफुल इस्लाम

Share This News

Related Post

Nitesh Karale Guruji

Nitesh Karale Guruji : नितेश कराळे गुरुजी शरद पवार गटाकडून वर्धा लोकसभेची निवडणूक लढवणार?

Posted by - March 20, 2024 0
पुणे : स्पर्धापरिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अस्सल वैदर्भीय बोलीभाषेतून मार्गदर्शन करणारे नितेश कराळे गुरुजी (Nitesh Karale Guruji) आता एका नव्या…
Team India

Cricketers Retirement : खळबळजनक ! एकाचवेळी ‘या’ 5 क्रिकेटर्सने केली निवृत्तीची घोषणा

Posted by - February 20, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रीडा विश्वातून एक खळबळजनक (Cricketers Retirement) बातमी समोर आली आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी…
Bhide Wada Smarak

Bhide Wada Smarak : अखेर ! ‘भिडेवाडा स्मारका’चा प्रश्न सुटला; सुप्रीम कोर्टातील खटला पुणे महापालिकेनं जिंकला

Posted by - October 16, 2023 0
पुणे : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्यानं मुलींची पहिली शाळा पुण्यातील ज्या वाड्यात सुरु केली. त्या भिडेवाड्याच्या (Bhide…

Pune Porsche Car Accident : पुणे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; ‘ते’ CCTV फुटेज लागले पोलिसांच्या हाती

Posted by - May 26, 2024 0
पुणे : पुण्याच्या कल्याणीनगर भागात गेल्या रविवारी भीषण अपघात (Pune Porsche Car Accident) घडला होता. एका मद्यधुंद अल्पवयीन चालकानं दुचाकीवरून…
Moshi

Germany’s Dusseldorf : जर्मनीचे ड्युसेलडॅार्फ ते पुण्यातले मोशी….

Posted by - June 26, 2023 0
गेल्या पन्नास वर्षांत भारतात उद्योग, कृषी, डेअरी, हॅाटेलसह पर्यटन आणि त्यासंबंधी विविध क्षेत्रांचा वेगाने विकास सुरू आहे. अनेक वस्तू आयात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *