IND Vs PAK

ठरलं तर मग ! ‘या’ ठिकाणी पार पडणारं IND vs PAK वर्ल्ड कपचा महामुकाबला

1342 0

मुंबई : भारत पाकिस्तान (IND vs PAK) सामना म्हणजे क्रिकेट रसिकांसाठी ती एक मेजवानीच असते. दोन्ही पारंपरिक देश समोरासमोर आले कि चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह आणि जोश असतो. जगभरातील कोट्यवधी क्रिकेटप्रेमी या दोन्ही देशांमधील सामन्याची आतुरतेने वाट बघत असतात. या दोन्ही संघांचा विचार केला तर भारत नेहमी वरचढ राहिला आहे. टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T-20 World Cup) एकदाच पाकिस्तानी टीमने भारतावर विजय मिळवला आहे.

भारत-पाक सामना ‘या’ स्टेडियमवर रंगणार
आगामी आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 (ICC World Cup 2023) भारतात होणार आहे. तो यावर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये खेळला जाऊ शकतो. यंदाच्या वनडे वर्ल्डकप मधील भारत पाकिस्तान सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) खेळवला जाणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठ स्टेडियम आहे. 1 लाख प्रेक्षकांना सामावून घेण्याची क्षमता या स्टेडियममध्ये आहे. त्यामुळे BCCI कडून या स्टेडियमची निवड करण्यात आली आहे.

या वर्ल्डकपचे अद्याप वेळापत्रक (Time Table) जाहीर करण्यात आलेले नाही. सध्या सुरू असलेली इंडियन प्रीमियर लीग (IPL) संपल्यानंतर बीसीसीआय विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या वर्ल्डकपमध्ये एकूण 48 सामने होतील. यामध्ये बाद फेरीचे तीन राऊंड होतील. यंदाची वर्ल्ड कप स्पर्धा 46 दिवस चालणार आहे.

Share This News

Related Post

History Of Indian Controversial Movie

History Of Indian Controversial Movie : भारतातील ‘हा’ पहिला चित्रपटही अडकला होता वादाच्या भोवऱ्यात? काय होतं कारण

Posted by - June 25, 2023 0
आदिपुरुष चित्रपटावरून उफाळून आलेला वाद थांबायचं नाव घेत नाही. त्यामुळे चित्रपट आणि वाद हे जुनं नातं वारंवार (History Of Indian…
IPL Final

IPL Final : IPL फायनलमध्ये ‘या’ 5 खेळाडूंच्या कामगिरीवर असणार सगळ्यांचे लक्ष

Posted by - May 26, 2024 0
आयपीएल 2024 स्पर्धेतील फायनलचा (IPL Final) सामना सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. ही फायनल कोलकाता नाईट रायडर्स…
Rahul Dravid

Rahul Dravid : राहुल द्रविडनंतर कोण असेल टीम इंडियाचा हेड कोच? ‘ही’ 3 नावे आहेत चर्चेत

Posted by - May 10, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राहुल द्रविड यांच्यानंतर (Rahul Dravid) नवीन मुख्य प्रशिक्षकाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *