B.Sai Praneeth

B.Sai Praneeth : वर्ल्ड चॅम्पियन बॅडमिंटनपटू बी साई प्रणीतची तडकाफडकी निवृत्ती

400 0

मुंबई : क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वर्ल्ड चॅम्पियन मेडलिस्ट खेळाडू बी साई प्रणीतने (B. Sai Praneeth) अचानक वयाच्या 31 व्या वर्षी निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करुन त्याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याच्या या निर्णयानं संपूर्ण क्रीडा विश्वाला मोठा धक्का बसला आहे.

बी साई प्रणीतची कारकीर्द
प्रणीतने 2020 रोजी टोकियो इथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. मात्र त्याला म्हणावं तेवढं यश मिळालं नाही आणि इस्रायेलच्या मिशा झिल्बरमन आणि नेदरलँड्सच्या मार्क कॅलजू कडून पराभूत झाल्यानंतर त्याला या स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते. त्याने राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेतील पुरुष दुहेरीत कांस्यपदक जिंकलं. साई प्रणीत 2008 मध्ये पहिल्यांदा जगभरात चर्चेत आला होता. यानंतर 2010 च्या जागतिक ज्युनियर चॅम्पियनशिपच्या एकेरीत कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर 2016 मध्ये साई प्रणीतने सलग 2 मेडल जिंकली.

कोणते पुरस्कार मिळाले
त्याने 2019 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिप हंगामात इतिहास रचत कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं होतं. इतकच नाही तर 2019 मध्ये अर्जुन पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला होता.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

5 Years Old Boy Died : हृदयद्रावक ! एक चुक घडली अन् क्षणात गेला 5 वर्षीय मुलाचा जीव

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंकडून लोकसभेसोबत विधानसभेचा उमेदवारही जाहीर

Section 144 : पुणे शहरामध्ये आजपासून कलम 144 लागू

Satara News : पिंपोडे बुद्रुक येथील ‘त्या’ व्यक्तीच्या खूनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश

Anjaneyasana : फुफ्फुसांच्या आरोग्यसाठी फायदेशीर आहे ‘हे’ आसन

Share This News

Related Post

BIG BREAKING : आकुर्डीतील अगरबत्ती कंपनीला भीषण आग; कंपनीलगत असलेल्या शाळेतील 400 विद्यार्थ्यांना सुखरूप ठिकाणी हलवले; आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू

Posted by - December 6, 2022 0
पिंपरी-चिंचवड : आज सकाळी साडेदहाच्या सुमारास पांढरकरनगर आकुर्डी येथील एका अगरबत्तीच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आज…

मनसेचं ‘मिशन विदर्भ’; राज ठाकरे विदर्भ दौऱ्याला आजपासून सुरुवात

Posted by - September 18, 2022 0
नागपुर: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून ( ता.18 सप्टेंबर) विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी 8.30 वाजता विदर्भ एक्सप्रेसने नागपूरला…
Pune Murder

भर दिवसा तरुणाची गोळ्या झाडून हत्या! पिंपरी-चिंचवड पुन्हा हादरलं

Posted by - May 22, 2023 0
पिंपरी-चिंचवड : पुण्यात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. काही दिवसांपूर्वी तळेगाव-दाभाडे नगरपरिषदेच्या परिसरात जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे…
Punit Balan

Punit Balan : पुनित बालन ग्रुप ईगल्सने पटकावले वर्ल्ड टेनिस लीगचे विजेतेपद

Posted by - December 27, 2023 0
दुबई : वृत्तसंस्था – पुनित बालन ग्रुप (Punit Balan) ईगल्सने वर्ल्ड टेनिस लीगचे विजेतेपद पटकावले. दुबई येथील इतिहाद अरेना येथे…
Rohit Sharma

Rohit Sharma : रोहित शर्माला सचिन तेंडुलकरचा ‘तो’ रेकॉर्ड तोडण्याची संधी; फक्त कराव्या लागतील ‘इतक्या’ धावा

Posted by - September 15, 2023 0
आज आशिया चषक 2023 मधील सुपर फेरीतील शेवटचा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. हा सामना कोलंबोतील आर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *