Neeraj Chopra

Neeraj Chopra : वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये नीरज चोप्राने रचला इतिहास ! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय एथलिट

996 0

भारताच्या नीरज चोप्राने (Neeraj Chopra) अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. नीरजने (Neeraj Chopra) पहिला थ्रो फाऊल केला होता, पण दुसऱ्या थ्रोमध्ये त्याने 88.17 मीटर अंतरावर भालाफेक करून सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. या संपूर्ण सामन्यात कोणत्याही खेळाडूला यापेक्षा पुढे भालाफेक करता आली नाही. तर, पाकिस्तानी खेळाडू नदीम अर्शद दुसऱ्या क्रमांकावर राहिला आणि त्याला रौप्यपदक जिंकण्यात समाधान मानावे लागले.

2020 साली ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेक प्रकारात सुवर्णपदक जिंकलेल्या नीरज चोप्राने आज येथे जागतिक स्पर्धेत पुन्हा सुवर्ण कामगिरी करत क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर भारताचा झेंडा आणखी उंच केला. यापूर्वी नीरज चोप्राने वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते. नीरज चोप्राने ऑलिम्पिकशिवाय डायमंड लीगमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. त्याचबरोबर आता नीरजने जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून मोठा विक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय एथलिट ठरला आहे.

Share This News

Related Post

CSK

MI vs CSK : मुंबईविरुद्धच्या सामन्याआधी चेन्नईला मोठा ! ‘हा’ खेळाडू सामन्याला मुकण्याची शक्यता

Posted by - April 14, 2024 0
मुंबई : आयपीएल 2024 च्या हंगामात आज डबल हेडर सामने (MI vs CSK) होणार आहेत. यात पहिला सामना लखनऊ सुपर…
Pollard and Rohit

MI New Captain : पोलार्ड बनला मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन! स्पर्धेच्या तोंडावर फ्रेंचायझीकडून करण्यात आली घोषणा

Posted by - January 7, 2024 0
मुंबई : आयपीएल 2024 ला अवघे काही महिने शिल्लक असताना मुंबई इंडियन्सने नव्या सिझनसाठी (MI New Captain) हार्दिक पंड्याच्या खांद्यावर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *