Rohit, Virat And Jadeja

WI vs IND: वनडे क्रिकेटमध्ये आज होणार ‘हे’ 3 मोठे विक्रम

542 0

बारबाडोस: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज दुसरी वनडे मॅच खेळली जाणार आहे. या मालिकेमध्ये टीम इंडियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. आजचा सामना जिंकून टीम इंडिया मालिकेत 2-0 अशी आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल. भारताने 2006 मध्ये वेस्ट इंडिजमध्ये वनडे मालिकेत 1-4असा पराभव स्विकारला होता. त्यानंतर टीम इंडियाने एकही वनडे मालिका गमावली नव्हती. 2006 नंतर झालेल्या सर्व 9 मालिकेत भारताने विजय मिळवला आहे. पहिल्या वनडेत सहज विजय मिळवणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूंकडे तीन मोठे विक्रम करण्याची संधी आहे.

रोहित आणि विराट
रोहित आणि विराट यांनी आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये एकूण 85 वेळा एकत्र फलंदाजी केली आहे. या दरम्यान त्यांनी 4 हजार 998 वेळा भागिदारी केली आहे. आजच्या लढतीत या दोघांनी मिळून 2 धावा केल्या तर त्यांच्या भागिदारीच्या 5 हजार धावा होतील. अशी कामगिरी करणारी ही जगातील 8 वी जोडी ठरेल.

विराट कोहलीच्या 13 हजार धावा
माजी कर्णधार विराट कोहलीला पहिल्या वनडेत फलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती. आता दुसऱ्या वनडेत जो फलंदाजीला आला आणि शतकी खेळी केली तर त्याच्या वनडेत 13 हजार धावा पूर्ण होतील. अशी कामगिरी करणारा तो भारताचा दुसरा तर जगातील पाचवा फलंदाज ठरेल. विराटने ही कामगिरी केली तर सर्वात वेगाने 13 हजार धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर होईल.

जडेजाला विक्रमाची संधी
वेस्ट इंडिजविरुद्ध रविंद्र जडेजाने 30 वनडेत 44 विकेट घेतल्या आहेत. या दोन्ही देशातील लढतीत सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रमाशी त्याने बरोबरी केली आहे. या बाबत त्याने वेस्ट इंडिजचे महान गोलंदाज कर्टनी वॉल्श यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. वॉल्श यांनी 38 सामन्यात 44 विकेट घेतल्या होत्या. आज जर त्याने एक विकेट घेतली तर दोन्ही देशातील लढतीमधील सर्वात यशस्वी गोलंदाज होऊ शकेल.

Share This News

Related Post

पोलार्डच्या हातून बॉल निसटला आणि अंपायरला लागला, त्यानंतर काय झाले व्हिडिओ पाहा

Posted by - May 10, 2022 0
मुंबई- वेस्ट इंडिजचा ऑल राऊंडर कायरन पोलार्ड बॉलिंग करत असताना अचानक त्याच्या हातून बॉल निसटला आणि तो थेट अंपायर लागला.…
Rohit Sharma

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर झाली ‘या’ नकोश्या विक्रमाची नोंद

Posted by - May 4, 2023 0
मुंबई : काल मुंबई आणि पंजाब यांच्यात आयपीएल 2023 मधील 46 वा सामना पार पडला. या सामन्यात दोन्ही संघानी धावांचा…
IND Vs AUS Women Cricket

IND Vs AUS Women Cricket : टीम इंडियाने इतिहास रचला ! ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदाच जिंकला कसोटी सामना

Posted by - December 24, 2023 0
मुंबई : टीम इंडियाच्या महिलांनी आज इतिहास रचला आहे.मुंबईत खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात (IND Vs AUS Women Cricket) भारताने ऑस्ट्रेलियाचा…
Royal-Challengers-Bangalore-RCB

…तर माझा मृत्यू झाला असता; RCB च्या ‘या’ खेळाडूचा मोठा खुलासा

Posted by - May 14, 2023 0
मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचा महत्वाचा खेळाडू मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) एका मुलाखतीदरम्यान एक मोठा खुलासा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *