Aaron Jones

Aaron Jones : वर्ल्डकपमध्ये अमेरिकेला एकहाती विजय मिळवून देणारा ॲरॉन जोन्स नेमका आहे कोण?

1035 0

अमेरिका : आजपासून टी – 20 वर्ल्डकपच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. अमेरिका आणि कॅनडा यांच्यात आज सकाळी सलामीचा सामना पार पडला. या सामन्यात दोन्ही संघानी उत्तम प्रदर्शन केले. मात्र या सगळ्यांमध्ये एका खेळाडूच्या खेळीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. या खेळाडूचे नाव आहे ॲरॉन जोन्स. या खेळाडूने अमेरिकेला एकहाती विजय मिळवून दिला. सध्या या खेळाडूची सगळीकडे चर्चा सुरु आहे. चला तर मग ॲरॉन जोन्सबद्दल अधिक जाणून घेऊया…

कोण आहे ॲरॉन जोन्स?
ॲरॉन जोन्सचा जन्म 19 ऑक्टोबर 1994 रोजी क्वीन्स, न्यूयॉर्क येथे झाला. जानेवारी 2016 मध्ये त्यानं लिस्ट ए पदार्पण करून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. नंतर त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये प्रवेश केला आणि 2017-18 मध्ये चार दिवसीय स्पर्धेत बार्बाडोससाठी पदार्पण केलं. एप्रिल 2019 मध्ये त्यानं पापुआ न्यू गिनीविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. नामिबियातील 2019 आयसीसी क्रिकेट लीग डिव्हिजन टू स्पर्धेत त्याच्या उल्लेखनीय कामगिरीनं यूएसएला एकदिवसीय क्रिकेटचा दर्जा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

ॲरॉन जोन्सची कारकीर्द?
ॲरॉन जोन्सच्या करिअरची आकडेवारी त्याचं या खेळातील सातत्य दाखवते. त्यानं एकदिवसीय सामन्यांमध्ये 36.35 आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 28.11 च्या सरासरीनं फलंदाजी केली आहे. त्यानं आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1454 धावा आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 478 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 94 धावा आहे, जी त्याने आजच्या विश्वचषकात कॅनडाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात केली.

काय घडले सामन्यात?
टी20 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात यजमान अमेरिकेनं कॅनडाचा 7 गडी राखून पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कॅनडाच्या संघानं निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून 194 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, अमेरिकेनं 17.4 षटकांत केवळ 3 गडी गमावून हे लक्ष्य गाठलं. अमेरिकेकडून ॲरॉन जोन्सनं 40 चेंडूंत 4 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीनं नाबाद 94 धावा केल्या. यासह त्यानं अमेरिकेसाठी सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रमही रचला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Weather Update : महाराष्ट्रावर दुहेरी संकट ! पुढील 2 दिवस अती महत्त्वाचे; IMD कडून नवा हायअलर्ट जारी

Nilesh Lanke : आमदार निलेश लंके यांचे संपर्क कार्यालय महापालिकेने केले जमीनदोस्त

Latur Crime : लातूर हादरलं ! पोटच्या गोळ्यानेच घेतला जन्मदात्या आईचा जीव

Pune Porsche Accident Case : अग्रवाल पती – पत्नीला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी

Kolhapur News : मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीची निर्घृणपणे हत्या

Weather Update : आज राज्यात मुसळधार पावसाची शक्यता ! हवामान विभागाकडून ‘या’ 23 जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट

Pune Crime News : पुण्यात पुन्हा ड्रंक अँड ड्राइव्ह ! नवले पुलावर मद्यधुंद डंपर चालकाने महिलेला उडवलं

Share This News

Related Post

Aakash Madhwal

मुंबई इंडियन्सचा स्टार आकाश मधवालवर ‘या’ लीगमध्ये क्रिकेट खेळण्यास बंदी

Posted by - May 26, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या आयपीएलमध्ये (IPL 2023) मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) एका खेळाडूची जोरदार चर्चा सुरु आहे. त्याने…
Wanindu Hasaranga

Wanindu Hasaranga : श्रीलंका संघाला मोठा धक्का! वानिंदू हसरंगाची अचानक टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती

Posted by - August 15, 2023 0
श्रीलंकेचा स्टार अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगाने (Wanindu Hasaranga) अचानक टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने स्वतः श्रीलंका क्रिकेट बोर्डाला याची…

दुसरी ‘पुनित बालन सेलिब्रीटी लीग’ क्रिकेट स्पर्धा तोरणा लायन्स्, पन्हाळा जॅग्वॉर्स संघांची विजयाची हॅट्रीक !!

Posted by - January 14, 2023 0
पुणे : मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार, दिग्दर्शक आणि दिग्गज कलाकार यांचा सहभाग असलेल्या आणि पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित दुसर्‍या ‘पुनित…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *