marcus

Marcus Stoinis : मार्कस स्टॉयनिसची अविस्मरणीय खेळी! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

1005 0

चेन्नई : केएल राहुलच्या लखनऊ सुपर जायंटने चेन्नईला त्यांच्याच घरच्या मैदानावर चेपॉकवर पराभूत केले. चेन्नईकडून मिळालेल्या 211 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करून मार्कस स्टॉयनिसच्या शतकी खेळीच्या जोरावर लखनऊने विक्रमी विजयाची नोंद केली आहे. एलएसजीने चेन्नईमध्ये आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करून दणदणीत विजय मिळवला आहे.

मार्कस स्टॉयनिसने आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळी करत एकट्याने लखनऊ संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह लखनऊचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. लखनऊने चेन्नई संघाचा या हंगामात सलग दुसऱ्यांदा पराभव केला आहे.

मार्कसने या सामन्यात 63 चेंडूत 124 धावांची नाबाद खेळी करून त्याने 13 चौकार आणि 6 षटकार मारले आहेत. आयपीएलच्या इतिहासातील मार्कसची ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या असून त्याने आयपीएलचा 13 वर्ष जुना विक्रम मोडला आहे. आयपीएलमधील दुसऱ्या डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता मार्कस स्टॉयनिसच्या नावावर नोंदवला आहे.

या आधी पॉल वल्थाटीने 2011 मध्ये चेन्नईविरुद्ध 120 धावांची नाबाद इनिंग खेळली तर वीरेंद्र सेहवागने 2011 मध्ये डेक्कन चार्जर्सविरुद्ध 119 धावांची इनिंग खेळली होती. या यादीत संजू सॅमसन चा देखील समावेश असून त्याने 2021 मध्ये पंजाबविरुद्ध 119 धावांची इनिंग खेळली होती. त्या पाठोपाठ शेन वॉटसनने 2018 मध्ये हैदराबादविरुद्ध 117 धावांची नाबाद खेळी खेळली होती.

‘या’ खेळाडूंनी नोंदवलेली सर्वात मोठी धावसंख्या
मार्कस स्टॉयनिस – 124 धावा (लखनऊ वि चेन्नई) 2024
पॉल वल्थाटी – 120 (पंजाब वि चेन्नई) 2011
वीरेंद्र सेहवाग – 119 (डेक्कन चार्जर्स वि दिल्ली)2011
संजू सॅमसन – 119 (राजस्थान वि पंजाब) 2021
शेन वॉटसन – 117 (चेन्नई वि हैदराबाद) 2018

8 वर्षांपूर्वी आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या मार्कस स्टॉइनिसने या आयपीएल पहिल्यांदाच शतक झळकावले आहे. पहिले शतक झळकावण्यासाठी त्याला आठ वर्षे लागली. चेन्नई विरुद्धच्या विजयामुळे लखनऊ संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Nitin Gadkari : नितीन गडकरींना भर सभेत आली चक्कर; Video आला समोर

Congress : काँग्रेसच्या ‘या’ उमेदवाराचे 6 वर्षासाठी पक्षातून निलंबन

Solapur News : भाजपला आणखी एक धक्का ! ‘या’ नेत्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये केला प्रवेश

Nagpur News : आरटीई नियमांना उच्च न्यायालयात आव्हान; शिक्षण विभागाला लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश

Pune News : संपत्ती लुबाडण्याचा काँग्रेसचा कट; भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

Loksabha : महायुतीत ‘या’ जागेचा तिढा अद्यापही सुटेना; 1 जागा अन् 3 इच्छुक?

Ruturaj Gaikwad : धोनीला ‘जे’ 17 वर्षांत जमलं नाही ‘ते’ ऋतुराजने पहिल्याच वर्षांत केले

RBI : आरबीआयची आणखी एका बँकेवर कारवाई ! ‘या’ बँकेतून ग्राहकांना काढता येणार नाही पैसे

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुण्यातील सभेची जागा बदलली; आता ‘या’ ठिकाणी होणार सभा

Shikhar Bank Loan Case : शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना क्लीन चीट

Share This News

Related Post

marlon samuels

ICC ची मोठी कारवाई! ‘या’ वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूवर घातली 6 वर्षांची बंदी

Posted by - November 23, 2023 0
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC ने भ्रष्टाचाराविरोधात मोठं पाऊल उचललं आहे. आयसीसीने वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर मार्लोन सॅम्युअल्सवर 6 वर्षाची…
Virat Kohli - Rohit Sharma

Virat Kohli – Rohit Sharma : रोहित-विराटचा जलवा; पाकिस्तान विरोधात 2 धावा करताच नावावर होणार ‘हा’ विक्रम

Posted by - September 9, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रोहित शर्मा आणि विराट कोहली (Virat Kohli – Rohit Sharma) या जोडीने वनडेमध्ये अक्षरशः आपला…
KL Rahul

Team India : KL राहुल तिसऱ्या कसोटीतून बाहेर; ‘या’ धडाकेबाज खेळाडूला मिळू शकते संधी

Posted by - February 12, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि इंग्लंड यांच्यात 15 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला (Team India) मोठा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *