Rohit And Babar Azam

Asia Cup 2023 ची तारीख ठरली ! ‘या’ दोन देशांमध्ये खेळवली जाणार स्पर्धा

897 0

क्रिकेट रसिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आशिया चषक 2023 वरून सुरु असलेला वाद अखेर मिटला आहे. या आशिया चषकात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या ( PCB) हायब्रिड मॉडेललाही परवानगी मिळाली आहे. त्यानुसार आशिया चषक स्पर्धेतील भारताचे सामने श्रीलंकेत खेळवण्यात येणार आहे.IND vs PAK हा बहुचर्चित सामना श्रीलंकेत पार पडणार आहे. BCCI आणि PCB यांच्यातला वाद मिटल्यामुळे ICC नेही सुटकेचा निश्वास टाकला आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने गुरुवारी याबाबतची अधिकृत घोषणा केली.

कशी असेल स्पर्धा ?
31 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर 2023 या कालावधीत आशिया चषक दोन देशांमध्ये खेळवला जाणार आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ यांच्यात एकूण 13 वन डे सामने होणार आहेत. या संघांची दोन गटांत विभागणी केली जाणार आहे आणि प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर 4 मध्ये खेळतील आणि त्यातून फायनलचे दोन संघ ठरतील.

कुठे खेळवण्यात येणार सामने?
या स्पर्धेतील 4 सामने पाकिस्तानात होणार आहेत. नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान हे पहिल्या टप्प्यात पाकिस्तानात खेळतील, नंतर दुसऱ्या टप्प्यात श्रीलंकेत भारताविरुद्ध सामन्यांसाठी येतील. श्रीलंकेतच फायनल खेळवण्यात येणार आहे.

Share This News

Related Post

hardik vs krunal

आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार! दोन भाऊ कर्णधार म्हणून एकमेकांना भिडणार

Posted by - May 7, 2023 0
मुंबई : यंदाची आयपीएल स्पर्धा खूप रंगतदार होत चालली आहे. यंदाच्या सीझनमध्ये आयपीएलचे 50 सामने झाले तरी अजून कोणताच संघ…

महाराष्ट्र केसरीचा थरार रंगणार वर्षा अखेरीस !

Posted by - September 14, 2022 0
महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची आणि कुस्तीचा कुंभमेळा असणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार वर्षाखेरीस डिसेंबरमध्ये रंगणार आहे. यंदा या स्पर्धेच्या आयोजनाची संधी…
Cricket News

Cricket News : भारताच्या ‘या’ 33 वर्षीय खेळाडूने अचानक घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Posted by - November 11, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी विश्वचषक 2023 मनोरंजक टप्प्यात येऊन ठेपला आहे. या स्पर्धेत (Cricket News) भारत अजूनही अपराजित…
R. Ashwin

Ind Vs Eng : रविचंद्रन अश्विनने रचला इतिहास; इंग्लंडविरुद्ध केले ‘हे’ ‘अनोखं शतक’

Posted by - February 23, 2024 0
भारत आणि इंग्लंडदरम्यान (Ind Vs Eng) पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्याला आजपासून सुरुवात झाली. या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून…

पुनीत बालन ग्रुपच्या शिवांश त्यागीला राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक

Posted by - September 16, 2022 0
पुणे: नाशिक येथे पीस तायक्वांदो अकादमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत ७४ किलो वजनी गटात दमदार कामगिरी बजावताना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *