Kohli

Kohli Retirement : ‘कोहली’ची क्रिकेटमधून निवृत्ती

757 0

मुंबई : काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या अंडर 19 वर्ल्डकप 2024 मध्ये कांगारूंनी टीम इंडियाचा पराभव (Kohli Retirement) केला. मात्र खेळाडूंनी आपल्या खेळीने सगळ्यांनाच प्रभावित केले. टीम इंडिया आतापर्यंत पाच वेळा अंडर 19 वर्ल्डकप जिंकली आहे. भारतीय युवा क्रिकेट संघाच्या विजयापैकी एक विजय म्हणजे, 2008 मध्ये अंडर 19 टीम इंडियानं जिंकलेला वर्ल्डकप. हा विजय खास आहे कारण, टीम इंडियाचं रनमशीन म्हणून ओळख असणाऱ्या विराट कोहलीच्या नेतृत्त्वात अंडर 19 क्रिकेट संघानं या विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. या संघात विराट कोहली शिवाय अजून एक कोहलीदेखील होता. त्याचं नाव तरुवर कोहली. एकेकाळी भारतीय युवा क्रिकेट संघाची आन-बान-शान असणाऱ्या तरुवर कोहलीने अचानक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्याने सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे.

कोण आहे तरुवर कोहली?
तरुवर कोहली हा उजव्या हाताचा फलंदाज होता. त्यांचा जन्म 17 डिसेंबर 1988 रोजी पंजाबमधील जालंधर येथे झाला. तरुवर उत्तम गोलंदाजीही करायचा. तो उजव्या हाताचा मध्यम गोलंदाजही होता. आयपीएल 2008 मध्ये त्याला राजस्थान रॉयल्सनं तरुवरला विकत घेतलं होतं. त्यानंतर 2009 मध्ये तो किंग्ज इलेव्हन पंजाब (आताचा पंजाब किंग्ज) चा देखील तरुवर कोहली महत्त्वाचा भाग होता. तरूवरचे वडील सुशील कोहली हे सुद्धा स्पोर्ट्स पर्सन होते, पण ते जलतरणपटू होते. तरुवर कोहली आयपीएलमध्ये मात्र आपली छाप सोडू शकला नाही. 2009 – 2010 नंतर त्याचं नाव हळूहळू क्रिकेट जगतातून गायब झालं. त्यानंतर 2013 रणजी ट्रॉफीमध्ये पंजाबकडून खेळताना तिहेरी शतक झळकावून तो पुन्हा चर्चेत आला.

तरुवर कोहलीची कारकीर्द ?
तरुवर कोहलीबाबत बोलायचं झालं तर त्यानं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 55 सामने खेळले आणि 97 डावांत 4573 धावा केल्या. त्याच्या नावावर 74 विकेट्सही आहेत. याव्यतिरिक्त लिस्ट एमध्ये कोहलीनं 72 सामने खेळताना 1913 धावा केल्यात. फर्स्ट क्लासमध्ये तरुवरनं 14 शतकं आणि 18 अर्धशतकं 53.8 च्या सरासरीनं धावा केल्या आहेत.तरूवर कोहली हा प्रथम श्रेणी क्रिकेटचा एक उत्कृष्ट खेळाडू, पण दुर्दैवानं त्याला टीम इंडियासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. तिहेरी शतकही त्याच्या नावावर आहे. नाबाद 307 धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ajay Maharaj Baraskar : अजय महाराज बारस्कर यांच्यावर मोठी कारवाई ! प्रहार जनशक्ती पक्षातून केली हकालपट्टी

Pune News : विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मनसे आक्रमक; पुणे विद्यापीठावर अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘या’ दिवशी काढणार मोर्चा

Maratha Reservation : मराठा आंदोलनात उभी फूट! मनोज जरांगेंवर त्यांच्याच सहकाऱ्याने केले ‘हे’ गंभीर आरोप

Tania Singh : मॉडेल तानिया सिंहची 28 व्या वर्षी आत्महत्या; ‘हा’ स्टार खेळाडू अडकला वादाच्या भोवऱ्यात

Pandhari Sheth Phadke : बैलगाडा शर्यतींचा बेताज बादशाह पंढरीशेठ फडके यांचे निधन

Accident News : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू

Pimpri-Chinchwad : पिपरी- चिंचवडमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

Maratha Reservation : मनोज जरांगेंनी पुन्हा उगारले आंदोलनाचं अस्त्र

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमधील मोरवाडी परिसरात टायरच्या गोडाऊनला भीषण आग

Parbhani News : महावितरणाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर ! शॉक लागून 3 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमणाच्या कारवाईदरम्यान पोलीस आणि नागरिकांमध्ये जोरदार राडा

Pune Crime : पुण्याचं उडता पंजाब होतंय का? आतापर्यंत पुणे पोलिसांकडून 2000 किलो एमडी ड्रग्ज जप्त

Zeeshan Siddique : काँग्रेसकडून झिशान सिद्दीकीची मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षपदावरून हकालपट्टी

Ameen Sayani Pass Away: रेडिओच्या सुवर्णयुगाचे शिल्पकार अमीन सयानी यांचे निधन

Share This News

Related Post

Breaking ! सोलापुरातील चाटी गल्लीमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट, जुना वाडा आगीच्या भक्ष्यस्थानी (व्हिडिओ)

Posted by - March 22, 2022 0
सोलापूर- सोलापुरातील मध्यवर्ती भागात असलेल्या चाटी गल्लीमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीमध्ये जुना लाकडी वाडा भस्मसात झाला. ही…
Team India

Cricket : ICC रँकिंगमध्ये भारताने टी20 अन् टेस्टमध्ये मारली बाजी मात्र वनडेत ‘या’ संघाने मारली बाजी

Posted by - August 27, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानने अफगाणिस्तानविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना (Cricket) 59 धावांनी जिंकला आणि या विजयासह त्यांनी तीन सामन्यांची…
Bajarang Punia

Bajarang Punia : साक्षी मलिकच्या निवृत्तीनंतर कुस्तीपटू बजरंग पुनियाने घेतला पद्मश्री परत करण्याचा निर्णय

Posted by - December 22, 2023 0
मुंबई : क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये भारताला ऑलिम्पिकमध्ये पदक (Bajarang Punia) जिंकवून देणाऱ्या कुस्तीपटू साक्षी…

गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

Posted by - April 12, 2022 0
कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत असून त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या मृत्युनंतर…
sharad pawar saheb

अखेर…शरद पवारांचा निवृत्तीचा निर्णय मागे; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष

Posted by - May 5, 2023 0
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून या घडामोडींना प्रचंड वेग आलेला होता. या घडामोडींकडे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *