T- 20 World Cup

T- 20 World Cup : टी- 20 वर्ल्ड कपसाठी ‘या’ 5 विकेटकिपर खेळाडूंनी सिद्ध केली दावेदारी

928 0

देशात सध्या इंडियन प्रीमिअर लीगची धूम सुरु आहे. 22 मार्च पासून या सिरीजला सुरुवात झाली असून 26 मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. ही लीग संपताच 4 जूनपासून टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. महत्वाचे म्हणजे आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमधून टी20 वर्ल्ड कपचा संघ निवडला जाणार आहे. त्यामुळे खेळाडूंना सिद्ध करण्यासाठी ही आयपीएल महत्वाची असणार आहे.

विकेटकिपरसाठी जोरदार चुरस
टीम इंडियात सर्वात जास्त चुरस आहे ती विकेटकिपरसाठी. पंधरा खेळाडूंच्या संघात दोन विकेटकिपर निवडताना बीसीसीआय निवड समितीचा चांगलाच कस लागणार आहे. टीम इंडियात विकेटकिपिंगसाठी एक-दोन नाही तर तब्बल पाच खेळाडूंनी दावा ठोकला आहे. यात ऋषभ पंत, केएल राहुल, संजू सॅमसन, ईशान किशन आणि दिनेश कार्तिक यांचा समावेश आहे.

आता यांच्या कामगिरीबद्दल जाणून घेऊया
संजू सॅमसन
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आणि विकेटकिपर अशी दुहेरी भूमिका संजू सॅमसन बजावत आहे. आतापर्यंत खेळलेल्या सात सामन्यात संजू सॅमसनने 264 धावा केल्या आहेत. यात त्याने 3 अर्धशतकं केलीत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे 82 आहे.

दिनेश कार्तिक
38 वर्षांच्या दिनेश कार्तिकने यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सनरायजर्सविरुद्धच्या सामन्यात आरसीबीकडून खेळताना दिनेश कार्तिकने अवघ्या 35 चेंडूत 83 धावांची अविस्मरणीय खेळी केली होती. कार्तिकने आतापर्यंत खेळलेल्या सात सामन्यात 226 धावा केल्यात. बेस्ट फिनिशर म्हणून कार्तिककडे पाहिले जात आहे.

ऋषभ पंत
30 डिसेंबर 2022 ला एका कार अपघतात ऋषभ पंतच्या पायाला जबर मार बसला. त्यानंतर तब्बल 14 महिन्यांच्या उपचारानंतर पंत मैदानावर परतला. आपल्या दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना पंतने दमदार कमबॅक केला. सहा सामन्यात पंतने 194 धावा केल्या. यात त्याने 2 अर्धशतके झळकावली आहेत.

केएल राहुल
लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार आणि विकेटकिपर केएल राहुलदेखील उत्तम फॉर्ममध्ये आला आहे. राहुलने यंदाच्या आयपीएलमध्ये सहा सामन्यात 204 धावा केल्यात. यात एका अर्धशतकी खेळीचा समावेशआहे. त्याचा स्ट्राईक रेट 138.77 आहे.

ईशान किशन
संजू सॅमसन आणि ऋषभ पंतसमोर ईशान किशनचं पारडं थोडं कमी आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या ईशान किशनने यंदाच्या आयपीएमध्ये अद्याप लौकीकाला साजेशी कामगिरी केलेली नाही. मुंबई इंडियन्सचा सलामीवीर ईशानने आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यात केवळ 184 धावा केल्यात. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुण्यात भरदिवसा बांधकाम व्यावसायिकावर गोळीबाराचा प्रयत्न; CCTV फुटेज आले समोर

Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरासारखीच ‘ही’ आहेत भारतातील 7 प्रसिद्ध राम मंदिरे

UPSC Results : पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाने UPSC परीक्षेत मिळवले घवघवीत यश

Pune Crime : धक्कादायक! लग्नाच्याच दिवशी 28 वर्षीय तरुणाने संपवलं जीवन

Pune University : एक भेट पुणे विद्यापीठाला; विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी..!

Pune Loksabha : पुणे लोकसभेसाठी MIM कडून अनिस सुंडके यांना उमेदवारी जाहीर

Eknath Khadse : खळबळजनक ! एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी

Astavakrasana : अष्टवक्रासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Vijender Singh

Vijender Singh : बॉक्सर विजेंदर सिंगचा भाजपमध्ये प्रवेश

Posted by - April 3, 2024 0
आंतरराष्ट्रीय बॉक्सर विजेंदर सिंहने (Vijender Singh) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपाचे महासचिव विनोद तावडे यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये हा पक्षप्रवेश पार…
Wrestling

Wrestling : भारतीय कुस्ती महासंघाला मोठा धक्का ! युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने केले निलंबित

Posted by - August 24, 2023 0
नवी दिल्ली : वर्ल्ड रेसलिंगने (Wrestling) भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व रद्द केलं आहे. कुस्ती महासंघाची (Wrestling) निवडणूक 45 दिवसात करू…
R. Ashwin

Ind Vs Eng : रविचंद्रन अश्विनने रचला इतिहास; इंग्लंडविरुद्ध केले ‘हे’ ‘अनोखं शतक’

Posted by - February 23, 2024 0
भारत आणि इंग्लंडदरम्यान (Ind Vs Eng) पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्याला आजपासून सुरुवात झाली. या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून…
transgender cricket player

ICC चा मोठा निर्णय ! आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमधील ट्रान्सजेंडर खेळाडूंवर घातली बंदी

Posted by - November 22, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आयसीसीने (ICC) ट्रान्सजेंडर खेळाडूंबाबत मोठा निर्णय घेतला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *