sunil chetri

Sunil Chetri Retirement : फुटबॉल पटू सुनील छेत्रीने घेतली निवृत्ती; सोशल मीडिया द्वारे दिली माहिती

625 0

सुनील छेत्री : भारतीय फुटबॉल टीमचा लोकप्रिय खेळाडू आणि कर्णधार सुनील छेत्रीने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का देत कुवेतविरुद्धच्या फिफा वर्ल्डकप पात्रता फेरीनंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. 39 वर्षीय छेत्रीने त्याच्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत भारतासाठी 145 सामने खेळले असून 93 गोल  केले आहेत.

सुनील छेत्रीने गुरुवारी त्याच्या निवृत्तीची घोषणा केली असून त्याने 6 जून रोजी कुवेत विरुद्ध फिफा वर्ल्डकप 2026 पात्रता फेरीनंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली आहे. छेत्री कडून या संधर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडीओ पोस्ट करून माहिती दिली आहे.

नेमके काय म्हटले व्हिडीओ मध्ये?

 

सुनीलने सुमारे 9 मिनिटांच्या व्हिडिओ पोस्ट करून निवृत्तीच्या निर्णयाबद्दल माहिती दिली. या सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सुनीलने लिहिले की, मला तुम्हाला काही सांगायचे आहे. छेत्री त्याच्या निवृत्तीच्या व्हिडिओमध्ये भावूक झालेला दिसत असून या व्हिडीओमध्ये त्याने त्याच्या डेब्यू सामन्यांच्या आठवणींची आठवण करून दिली आहे. यावेळी त्याला सुखी सरांची आठवण झाली, जे त्याचे पहिले राष्ट्रीय टीमचे प्रशिक्षक होते.

छेत्रीने सांगितले की, “मी माझा पहिला सामना खेळलो तो मला अजूनही आठवत आहे. माझा पहिला सामना, माझा पहिला गोल, हा माझ्या प्रवासातील सर्वात संस्मरणीय क्षण होता आणि मुळात मला कधीच वाटलं नव्हतं की, मी भारतासाठी इतके सामने खेळेन. मी या निर्णयाबाबत पहिल्यांदा माझ्या आई-वडिलांना सांगितल्यानंतर माझी बायको मात्र रडू लागली आणि वडिलांना या निर्णयाचा आनंद झाला. मी आईला म्हणालो की, तू मला नेहमी म्हणत होतीस की, मला खेळताना पाहून तुला खूप दडपण येते मात्र आता तसे होणार नसून मी भारतासाठी पुन्हा खेळणार नाही मग तू का रडतेय, असंही छेत्रीने या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : भाजपाचे माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Share This News

Related Post

sucide Nagpur

क्रिकेट सट्ट्यात पैसे हरल्यामुळे तरुणाची नैराश्यातून आत्महत्या

Posted by - May 23, 2023 0
नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका क्षणात संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले आहे. यामध्ये क्रिकेट…

इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग : पुनित बालन ग्रुप संघाची विजयाची हॅट्रीक; न्युट्रीलिशियसचा दुसरा विजय !

Posted by - November 29, 2022 0
पुणे : बालन ग्रुप तर्फे आयोजित दुसर्‍या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत पुनित बालन ग्रुप संघाने स्पर्धेत…
KL Rahul

PAK Vs IND : पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यामध्ये केएल राहुलची एन्ट्री होताच ‘या’ खेळाडूला मिळणार डच्चू

Posted by - September 7, 2023 0
कोलंबो : आशिया कप 2023 मध्ये टीम इंडिया सुपर 4 मधील पहिला सामना (PAK Vs IND) हा 10 सप्टेंबरला खेळणार…
Wrestlers-Protest

कुस्तीपटूंच्या आंदोलनातून साक्षी मलिकची माघार; नोकरीत पुन्हा रुजू

Posted by - June 5, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्या नेतृत्वाखाली सर्व कुस्तीपटूंनी कुस्ती संघाचे अध्यक्ष आणि…
Hardik Pandya

Hardik Pandya : भारताला मोठा धक्का! हार्दिक पंड्या उर्वरित वर्ल्डकपमधून बाहेर; ‘या’ खेळाडूची होणार संघात एंट्री

Posted by - November 4, 2023 0
मुंबई : भारतीय संघ उद्या म्हणजेच 5 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. मात्र या सामन्याअगोदर टीम इंडियाला मोठा धक्का…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *