Shubhaman Gill

शुभमन गिलनं बाबर आझमचा विक्रम मोडत केली ‘ही’ ऐतिहासिक कामगिरी

610 0

मुंबई : काल आरसीबी (RCB) आणि गुजरात (Gujrat) यांच्यात पार पडलेल्या सामन्यात युवा खेळाडू शुभमन गिलने (Shubman Gill) शतक झळकावून एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याच्या या शतकी खेळीच्या जोरावर गुजरातने आरसीबीवर दमदार विजय मिळवला आहे. या सामन्यात गुजरातने मिळवलेल्या विजयामुळे आरसीबीच्या संघाला प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले. या विजयी खेळीसह शुभमनने पाकिस्तानी क्रिकेटपटू बाबर आझमला (Babar Azam) मागे टाकत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

शुभमन गिलनं मोडला बाबर आझमचा विक्रम
कालच्या सामन्यात गुजरातच्या संघाची सुरुवात काहीशी खराब झाली. गुजरातचा सलामीवीर रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha) केवळ 12 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र यानंतर शुभमन गिलने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने 52 चेंडूत 5 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 104 धावा केल्या. गिलने या दमदार खेळीसह टी-20 क्रिकेटमधील 25 वेळा 50 हून अधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे.

बाबर आझमचा मोडला रेकॉर्ड
शुभमन गिल टी20 क्रिकेटच्या इतिहासात 25 वेळा पन्नासहून अधिक धावा करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्याने पाकिस्तानच्या बाबर आझमला या बाबतीत मागे टाकले आहे. याआधी टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 50 हून अधिक धावा करण्याचा विक्रम बाबर आझमच्या नावावर होता. आता तो शुभमन गिलच्या नावावर झाला आहे.

टी 20 क्रिकेटमध्ये 25 वेळा 50 हून अधिक धावा करणार युवा खेळाडू :
शुभमन गिल : 23 वर्ष 255 दिवस
अहमद शहजाद : 24 वर्ष 75 दिवस
बाबर आजम : 24 वर्ष 135 दिवस
ग्लेन फिलिप्स : 24 वर्ष 208 दिवस
इशान किशन : 24 वर्ष 272 दिवस

आयपीएलमध्ये सलग दोन शतकं झळकवणारा खेळाडू
आरसीबी विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिलने सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्धच्या सामन्यात 101 धावांची खेळी केली होती. आयपीएलच्या इतिहासात सलग दोन शतकं झळकावणारा शुभमन गिल (2023)चौथा फलंदाज ठरला आहे. याआधी विराट कोहली(2023), शिखर धवन (2020) आणि जोस बटलर (2022) यांनी ही कामगिरी केली आहे.

Share This News

Related Post

IPL

IPL 2024 : IPL चे सामने आता अधिक रोमांचक होणार; BCCI लीगमध्ये करणार ‘हा’ मोठा बदल

Posted by - March 18, 2024 0
मुंबई : येत्या 22 मार्चपासून इंडियन प्रीमियर लीगला (IPL 2024) सुरुवात होणार आहे. आयपीएलचा हा हंगामा सलग दोन महिने सुरु…
Stuart Broad Retirement

Stuart Broad Retirement : स्टुअर्ट ब्रॉडने Ashes सीरिजदरम्यान अचानक घेतली निवृत्ती

Posted by - July 30, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंड क्रिकेट टीमचा वेगवान आणि अनुभवी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने (Stuart Broad) निवृत्तीचा निर्णय जाहीर…
IND Vs WI Odi Series

IND Vs WI Odi Series : वेस्टइंडिजमध्ये भारताने पाकिस्तानला मागे टाकत नोंदवला ‘हा’ मोठा विश्वविक्रम

Posted by - August 2, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने काल वेस्ट इंडिजविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-1 ने (IND Vs WI Odi Series)…

आंतरशालेय गोळाफेक स्पर्धेत विभूती मावळे, जयनी पाटील यांची नेत्रदीपक कामगिरी

Posted by - June 10, 2022 0
पुणे- बेंगाळे स्पोर्ट अकॅडमीच्यावतीने भोसरी येथे आयोजित केलेल्या आंतरशालेय ऍथलेटिक्स स्पर्धेत विभूती मावळे हिने सुवर्णपदक तर जयंती पाटील हिने रौप्यपदक…
IPL 2024 Retention

IPL 2024 Auction : आयपीएल लिलावाची तारीख ठरली ! ‘या’ खेळाडूंना लागणार लॉटरी

Posted by - December 3, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – IPL 2024 च्या आयपीएल लिलावाची तारीख अधिकृतपणे घोषित करण्यात आली आहे. हा लिलाव 19 डिसेंबरला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *