Shubman Gill

Shubman Gill :आयसीसी रँकिंग जाहीर! बाबर आझमला मागे टाकत शुभमन गिलने मिळवले अव्वल स्थान

544 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघाचा आश्वासक युवा सलामीवीर शुभमन गिलने (Shubman Gill) पाकिस्तानला मोठा धक्का देत आयसीसी एकदिवसीय फलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. त्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मागे टाकत हे स्थान पटकावले आहे. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी बाबर आझम पहिल्या क्रमांकावर होता. या विश्वचषकात शुभमन गिलने खोऱ्याने धावा केल्या तर तर दुसरीकडे बाबर आझमच्या बॅटमधून मोठ्या कष्टाने धावा पाहायला मिळाल्या.

गिलने श्रीलंकेविरुद्ध 92 धावांची, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 23 धावांची खेळी केली. विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध खेळलेल्या इनिंगमुळे तो नंबर वन बनला. आता त्याचे 830 रेटिंग गुण आहेत, तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम त्याच्यापेक्षा 6 गुणांनी मागे आहे. या यादीत क्विंटन डी कॉक तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांकावर असलेल्या खेळाडूमध्ये खूप फरक आहे.

भारताच्या तीन फलंदाजांचा टॉप-10 मध्ये समावेश
विश्वचषकात धावा करणारा भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांचाही शुभमन गिलसह टॉप-10 क्रमवारीत समावेश आहे. या यादीत विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे, तर रोहित शर्मा सहाव्या क्रमांकावर आहे. हे दोघे ज्या शैलीत फलंदाजी करत आहेत, ते पाहता भविष्यात क्रमवारीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

Share This News

Related Post

Rajiv Mishra Death

Rajiv Mishra Death: क्रीडा क्षेत्रात मोठी खळबळ ! हॉकीपटू राजीव मिश्रा यांचा कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

Posted by - June 24, 2023 0
भारताचे माजी ज्युनियर हॉकीपटू राजीव कुमार मिश्रा वाराणसीच्या सरसौली भागात राहत्या घरी गूढ परिस्थितीत मृतावस्थेत (Rajiv Mishra Death) आढळून आले.…
IND vs ENG

IND vs ENG : पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा धुव्वा उडवत इंग्लंडचा सनसनाटी विजय

Posted by - January 28, 2024 0
हैदराबाद : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये (IND vs ENG) टीम इंडियाला 28 रनने पराभव पत्करावा लागला आहे. इंग्लंडने दिलेल्या 231…
Imran Khan

Imran Khan Jail : इम्रान खान यांना मोठा धक्का; ‘त्या’ प्रकरणी 10 वर्षांची झाली जेल

Posted by - January 30, 2024 0
इस्लामाबाद : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान यांना 10 वर्षाच्या तुरुंगवासाची (Imran Khan Jail) शिक्षा…
Virat Kohli

Virat Kohli : फक्त 29 धावा अन् विराट कोहली ठरणार ‘ही’ कामगिरी करणारा पहिला खेळाडू

Posted by - May 22, 2024 0
मुंबई : आयपीएल 2024 च्या एलिमिनेटर सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि राजस्थान रॉयल्स (RR) आमने सामने असणार आहेत.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *