Shivraj Rakshe

Maharashtra Kesari 2023 : शिवराज राक्षे ठरला डबल ‘महाराष्ट्र केसरी’

647 0

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती (Maharashtra Kesari 2023) स्पर्धेतील फायनलचा सामना आज खेळवला गेला. या सामन्यात शिवराज राक्षे याने 65 वा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला आहे.

फायनल सामना नाशिकचा हर्षवर्धन सदगीर विरुद्ध नांदेडचा शिवराज राक्षे असा खेळवला गेला होता. त्यात शिवराजने सदगीरचा 6-0 ने पराभव केला आहे. याआधी 2023 साली शिवराज राक्षे याने पुण्यात झालेल्या 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शिवराजने महेंद्रला चीतपट करून महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली होती. अशातच आता शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरी ठरला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्याच्या फुलगावमद्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये सिकंदर शेख याने शिवराज राक्षेला आस्मान दाखवलं होतं. भारतीय कुस्ती महासंघाने आयोजित केलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सिकंदर शेख याने बाजी मारली अन् एक वर्षापूर्वीच्या पराभवाचा बदला घेतला होता.

Share This News

Related Post

AUS vs PAK

AUS vs PAK : ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्यामुळे सामन्यादरम्यान मैदानात राडा; पोलीस आले आणि…

Posted by - October 21, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 20 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया विरूद्ध पाकिस्तान (AUS vs PAK) यांच्यामध्ये सामना रंगला होता. बंगळूरूच्या चिन्नस्वामी…

आरती पाटील पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२४ साठी पात्र

Posted by - February 3, 2024 0
पुणे, २ फेब्रुवारी २०२४: भारताची उदयोन्मुख बॅडमिंटनपटू आरती पाटील हिने दि. २० ते २५ फेब्रुवारी या कालावधीत पटाया, थायलंड येथे…
Ben Stokes

बेन स्टोक्सने टेस्टमध्ये रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कॅप्टन

Posted by - June 4, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंड (England) आणि आयर्लंड (Ireland) या दोन संघातील एकमेव कसोटी सामना शनिवारी पार पडला. हा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *