Rohit Sharma

Rohit Sharma : रोहित शर्मा रचणार इतिहास ! ‘हे’ 3 विक्रम मोडण्याची आहे संधी

555 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 सिरीजतील पहिला सामना आज होणार आहे. या सिरीजमधील सर्वांच्या नजरा रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली यांच्यावर असतील जे 14 महिन्यांनंतर या फॉरमॅटमध्ये कमबॅक करत आहेत.रोहित शर्मा नोव्हेंबर 2022 नंतर पहिला T20 सामना खेळणार आहे. मुख्य म्हणजे दोन्ही देशांमधील ही पहिली टी-20 मालिका आहे. या मालिकेत रोहित शर्माला इतिहास रचण्याची संधी आहे.

रोहित शर्माला ‘हे’ 3 विक्रम मोडण्याची आहे संधी
1) अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेत रोहितने 18 षटकार लगावल्यास तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 षटकार मारणारा पहिला फलंदाज ठरेल.
2) जर रोहितने कर्णधार म्हणून अफगाणिस्तान विरुद्धची मालिका 3-0 अशी जिंकल्यास तो भारताच्या टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार ठरेल.
3) या मालिकेत रोहितने 155 धावा केल्या तर तो टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या विराट कोहलीला मागे टाकेल. रोहित शर्माने 148 टी-20 सामन्यात 3853 धावा केल्या आहेत तर विराटच्या नावावर 4008 धावा आहेत.

अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघ
रोहित शर्मा (C), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग,आवेश खान, मुकेश कुमार.

अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ
इब्राहिम झादरान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्ला झाझाई, रहमत शाह, नजीबुल्ला झादरान, मोहम्मद नबी, करीम जनात, अजमुल्ला उमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारुकी, फरीद अहमद. नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदिन नायब आणि राशिद खान.

भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिकेचे वेळापत्रक
पहिला T20- 11 जानेवारी- मोहाली
दुसरा T20- 14 जानेवारी- इंदूर
तिसरा T20- 17 जानेवारी- बंगळुरू

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Jalgaon Accident : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बाईकस्वारांना धडक

Shiv Sena : शिंदेंची ‘शिवसेना’, भरत गोगावले प्रतोदपदी; आता पुढे काय?

Shivsena : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! मूळ राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय

MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेच्या निकालाअगोदर राज्यातील प्रमुख नेत्यांनी दिल्या ‘या’ प्रतिक्रिया

Shiv Sena MLA Disqualification Case : निकालाला अवघे काही तास शिल्लक ! ‘या’ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

Pune News : सारथी, बार्टी, महाज्योतीचा पेपर फुटला; विद्यार्थ्यांनी परीक्षेवर टाकला बहिष्कार

Charminar Express : चारमीनार एक्स्प्रेसचे 3 डबे रुळावरुन घसरले; 5 जण जखमी

Pune Accident : ‘त्या’ एका बाईकच्या नो एन्ट्रीमुळे निष्पाप तरुणाचा डंपरखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

Pankaja Munde : पंकजा मुंडेंना मोठा धक्का ! वैद्यनाथ कारखान्याचा ‘या’ दिवशी होणार लिलाव

Shiv Sena MLA Disqualification : कोणत्याही बाजूने निकाल लागला तरी ‘या’ 2 आमदारांची आमदारकी राहणार कायम

Share This News

Related Post

Ravichandran-Ashwin-and-Ravindra-Jadeja

IND vs ENG : आर अश्विन, रवींद्र जाडेजानं रचला इतिहास; अनिल कुंबळे- हरभजन सिंहचा ‘तो’ विक्रम मोडला

Posted by - January 25, 2024 0
भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात हैदराबाद येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीत भारताचा अनुभवी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि…
IPL

IPL 2024 : आयपीएलला मोठा धक्का ! मोहम्मद शमीसह ‘हे’ 9 खेळाडू स्पर्धेतून बाहेर

Posted by - March 13, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि इंग्लंडदरम्यानची पाच कसोटी सामन्यांची मालिका संपलीय आणि आता क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागली आहे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *