Rohit Sharma

Rohit Sharma : रोहितने विराट-सचिनला टाकले मागे; ‘हा’ विक्रम करणारा ठरला पहिला भारतीय

2323 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नेपाळविरूद्धच्या सामन्यात उत्तम कामगिरी केली. यावेळी रोहितने 59 बॉल्समध्ये नाबाद 74 रन्सची कामगिरी केली. त्याच्या या खेळीमध्ये 6 फोर आणि 5 सिक्सेसचा समावेश होता. त्याच्या या उत्तम खेळीनंतर त्याला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देखील देण्यात आला. या खेळीनंतर त्याच्या नावावर अनेक मोठे विक्रम झाले.

रोहितने मोडला कोहलीचा रेकॉर्ड
आशिया कपमध्ये (ODI आणि T-20) सर्वाधिक रन्स करण्याच्या बाबतीत रोहित (Rohit Sharma) दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. नेपाळविरूद्धच्या खेळीनंतर त्याने 33 सामन्यांमध्ये 1101 रन्स केले आहेत. या यादीत त्याने कुमार संगकारा आणि विराट कोहली यांना मागे टाकलंय. तर या यादीमध्ये सनथ जयसूर्या पहिल्या क्रमांकावर आहे. जयसूर्याच्या नावे 1220 रन्सची नोंद आहे.

आशिया कपमध्ये सर्वाधिक रन असलेले खेळाडू
सनथ जयसूर्या – 25 सामने 1220 रन्स
रोहित शर्मा – 33 सामने 1101 रन्स
कुमार संगकारा – 24 सामने 1075 रन्स
विराट कोहली – 23 सामने 1046 रन्स
सचिन तेंडुलकर – 23 सामने 971 रन्स

सचिन तेंडुलकरलाही टाकले मागे
सर्वाधिक रन्सनंतर रोहित शर्माने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरलाही एका विक्रमामध्ये मागे टाकले आहे. आशिया कपमध्ये भारतीय खेळाडू म्हणून रोहित सर्वाधिक 50 पेक्षा जास्त स्कोअर करण्याच्या बाबतीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. या स्पर्धेच्या इतिहासातील रोहितचे हे १० वे अर्धशतक आहे. सचिन तेंडुलकर 9 अर्धशतकासह दुसऱ्या तर विराट कोहली 8 अर्धशतकासह तिसऱ्या स्थानावर आहे.

सर्वाधिक सिक्स रोहितच्या नावावर
नेपाळविरूद्धच्या सामन्यानंतर रोहित शर्माने अजून एक रेकॉर्ड केला आहे. यामध्ये वनडे एशिया कपमध्ये सर्वाधिक सिक्सेस लगावणारा रोहित पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. आतापर्यंत रोहितने एकूण 22 सिक्सेस लगावले आहे. यावेळी त्याने टीम इंडियाचा माजी खेळाडू सुरेश रैनाला मागे सोडले आहे. रैनाच्या नावावर एकूण 18 सिक्स आहेत.

Share This News

Related Post

Jasprit Bumrah

IND vs AUS: बुमराहने रचला इतिहास ! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Posted by - October 8, 2023 0
चेन्नई : वृत्तसंस्था – एकदिवसीय विश्वचषक 2023 (IND vs AUS) मधील पाचवा सामना आज टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवला…
Presidential Medals

Presidential Medals : देशातील 954 पोलीसांना राष्ट्रपती पदके जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ 76 जणांचा समावेश

Posted by - August 15, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील 954 पोलिसांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सोमवारी राष्ट्रपती पदके (Presidential Medals) जाहीर करण्यात…
UPSC Civil Service Result Declared

UPSC Civil Service Result Declared : UPSC नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; आदित्य श्रीवास्तव ठरला टॉपर

Posted by - April 16, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय लोकसेवा आयोगाने UPSC नागरी सेवा परीक्षा (UPSC CSE) 2023 चा अंतिम निकाल आज म्हणजेच…
KL Rahul

PAK Vs IND : पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यामध्ये केएल राहुलची एन्ट्री होताच ‘या’ खेळाडूला मिळणार डच्चू

Posted by - September 7, 2023 0
कोलंबो : आशिया कप 2023 मध्ये टीम इंडिया सुपर 4 मधील पहिला सामना (PAK Vs IND) हा 10 सप्टेंबरला खेळणार…
Asian Games

Asian Games : भारताच्या महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेला हरवून रचला इतिहास

Posted by - September 25, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एशियन गेम्समध्ये (Asian Games) भारताच्या महिला क्रिकेट संघाने इतिहास घडवत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. फायनलमध्ये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *