Rohit Sharma

Rohit Sharma : हिटमॅन रोहितने मोडला शाहिद आफ्रिदीचा ‘तो’ विक्रम

1123 0

कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडिअमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात रंगतदार सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि गिल यांनी आक्रमक सुरुवात केली, पण वेल्लालागे याने भारताला एकापाठोपाठ एक चार धक्के देत सामना रंगतदार केला. रोहित शर्माने श्रीलंकाविरोधात आक्रमक अर्धशतक ठोकले. या अर्धशतकाबरोबर त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली. रोहित शर्माने आशिया चषकात सर्वाधिक षटकारांचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

आफ्रिदीचा विक्रम मोडला
आशिया चषकात रोहित शर्माने सर्वाधिक षटकारांचा विक्रम केला आहे. रोहित शर्माने आशिया चषकात 28 षटकार ठोकण्याचा पराक्रम केला आहे. रोहित शर्माने पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीचा विक्रम मोडलाय. शाहीद आफ्रिदीच्या नावावर 26 षटकार आहेत. तिसऱ्या क्रमांकवर श्रीलंकेचा सनथ जयसुर्या आहे. जयसुर्याच्या नावावर 23 षटकार आहे. या यादीत सुरेश रैना चौथ्या क्रमांकावर आहे. सुरेश रैनाने आशिया चषकात 18 षटकार ठोकले आहेत.

‘हा’ पराक्रम करणारा एकमेव खेळाडू
आशिया चषकात रोहित शर्मा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरलाय. याआधी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. तिसऱ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकरचा क्रमांक आहे. रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीला आठ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. वनडे, कसोटी आणि टी20 मध्ये रोहित शर्मा सलामीला फलंदाजी करतो. आशिया चषकात रोहित शर्मा याने 50 पेक्षा जास्त धावसंख्या दहा वेळा केल्या आहेत, असा पराक्रम करणारा रोहित शर्मा एकमेव फलंदाज आहे.

Share This News

Related Post

Virat Kohli

Virat Kohli : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकत विराट कोहलीने ‘हा विक्रम केला नावावर

Posted by - November 2, 2023 0
मुबई : सध्या भारतात वनडे वर्ल्डकप 2023 खेळवला जात आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये वानखेडेच्या मैदानावर आज सामना पार पडत…
Rishabh Pant

Rishabh Pant : ऋषभ पंतचा जलवा कायम ! न खेळताही रोहित अन् विराटला टाकले मागे

Posted by - July 5, 2023 0
मुंबई : टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. मागच्या वर्षी 30 डिसेंबर रोजी…
IPL 2024 Retention

IPL 2024 : रिटेन आणि रिलिज खेळाडूंची यादी जाहीर केल्यानंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम राहिली शिल्लक?

Posted by - November 28, 2023 0
मुंबई : आयपीएल 2024 (IPL 2024) पूर्वी सर्व दहा संघांनी रिटेन आणि रिलिज खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक…
BJP New Slogan

अखेर ठरलं! नरेंद्र मोदी ‘या’ दिवशी घेणार तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ

Posted by - June 7, 2024 0
नवी दिल्ली: देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला स्वबळावर 240 तर एनडीएला 294 जागांवर यश मिळाल्यानंतर आज दिल्लीतील संसद…
Loksabha Election

Loksabha Election : ना राहुल गांधी ना शरद पवार इंडिया आघाडीच्या संयोजकपदी ‘या’ नेत्याची नियुक्ती

Posted by - January 13, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूका (Loksabha Election) जवळ आल्याने सर्वच पक्ष तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहेत. राजकीय वर्तुळात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *