Rajkot Stadium

Rajkot Stadium : राजकोट स्टेडियमला ‘शाह’ यांचं नाव देण्यात येणार; ‘या’ दिवशी पार पडणार सोहळा

535 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांची मालिका चांगलीच रंगतदार ठरतेय. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा 28 धावांनी पराभव केला आणि मालिकेत आघाडी घेतली. पण टीम इंडियाने या पराभवाचा बदला दुसऱ्या म्हणजे विशाखापट्टणम कसोटीत घेतला. टीम इंडियाने इंग्लंडवर तब्बल 106 धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच पाच सामन्यांची मलिका आता 1-1 अशी बरोबरीत आली आहे. या सिरीजमधील तिसरा सामना येत्या 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये (Rajkot Stadium) खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करणार आहेत.

राजकोट स्टेडिअमचं नाव बदलणार
भारत-इंग्लंड तिसऱ्या कसोटीआधी एक मोठा बदल होणार आहे. राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडिअमचं नाव कसोटी सामन्याच्या एक दिवस आधी म्हणजे 14 फेब्रुवारीला बदलणार आहे. या स्टेडिअमचं नवं नाव माजी प्रथम श्रेणी क्रिकेटर आणि अनुभवी प्रशासक निरंजन शाह यांच्या नावावर ठेवलं जाणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह राजकोटच्या नव्या निरंजन शाह स्टेडिअमचं (Niranjan Shah Stadium) उद्घाटन करणार आहे. राजकोट स्टेडिअमचे सचिव हिमांशु शाह यांनी मीडियाला ही माहिती दिली आहे.

कोण आहेत निरंजन शाह?
निरंजन शाह हे सौराष्ट्रचे माजी क्रिकेटपटू आहेत. त्यांनी सौराष्ट्रसाठी 12 प्रथम श्रेणी सामने खेळलेत. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सचिवपदी त्यांनी तब्बल 40 वर्ष काम केलं. बीसीसीआयच्या सचिवपदाचा कार्यभारही त्यांनी सांभाळला आहे. याशिवाय नॅशनल क्रिकेट अकादमी बंगळुरुत ते अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमला निरंजन शाह यांचं नाव देण्याचा प्रस्ताव गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये एका बैठकीत ठेवण्यात आला होता. हा प्रस्ताव एकमताने मंजुर करण्यात आला होता.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sanjay Raut : संजय राऊतांनी शिंदे-पवारांना दिले थेट चॅलेंज! म्हणाले ‘हिंमत असेल तर…’

Nashik News: मुंबई-आग्रा महामार्गांवर बर्निंग ट्रकचा थरार

Pune Crime News : प्रेमप्रकरण जीवावर बेतलं ! पुण्यातील ‘त्या’ हिरे व्यापाऱ्याची गुवाहाटीमध्ये हत्या

RBI कडून महाराष्ट्रातील ‘या’ बँकेचा परवाना रद्द

Bus Fire : महाडजवळ खासगी बसला भीषण आग; 19 जण थोडक्यात वाचले

Share This News

Related Post

Amit Shah

Amit Shah : भारत-म्यानमार सीमेवरील मुक्तसंचार बंद; गृहमंत्री अमित शाहांची मोठी घोषणा

Posted by - January 20, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – म्यानमार सीमा अधिक सुरक्षित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने (Amit Shah) घेतला आहे. म्यानमारच्या सीमेवर आता…
MS Dhoni

MS Dhoni : धोनीला त्याच्या जवळच्याचं मित्रांनी लावला 15 कोटींचा चूना

Posted by - January 5, 2024 0
मुंबई : भारताचा माजी कर्णधार कॅप्टन कूल एम एस धोनी (MS Dhoni) याने त्याच्या माजी व्यवसायिक भागीदारांविरोधात रांची कोर्टात क्रिमिनल…
Ellyse Perry

Ellyse Perry : एलिस पेरीने रचला इतिहास ! ‘ही’ कामगिरी करणारी ठरली पहिलीच महिला क्रिकेटपटू

Posted by - March 13, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महिलांच्या प्रिमीअर लिग 2024 मध्ये मुंबईविरूद्ध बंगळूरूच्या सामन्यात RCB ने बाजी मारून प्लेऑफमध्ये आपली जागा…
chandrayan 3

Chandrayaan-3 : ठरलं ! 14 जुलैला होणार चांद्रयान -3 चं प्रक्षेपण

Posted by - July 7, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने बहुप्रतिक्षित चंद्रयान-3 (Chandrayaan-3) या मोहिमेच्या प्रक्षेपणाची तारीख जाहीर केली आहे. चंद्रयान-3…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *