Pakistan Team

Pakistan Team : पाकिस्तानला डबल धक्का ! आशिया चषकातून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तानला बसला ‘हा’ मोठा धक्का

556 0

आशिया चषकाच्या सुपर 4 सामन्यात पाकिस्तान संघाला (Pakistan Team) श्रीलंकेकडून दोन विकेटने निसटता पराभव स्वीकारावा लागला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा पराभव केला. श्रीलंकेच्या विजयामुळे पाकिस्तान संघाचे आशिया चषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. हा पराभव पाकिस्तानच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. कारण भारत आणि श्रीलंका यांच्याकडून लागोपाठ दोन सामन्यात झालेल्या पराभवाचा फटका पाकिस्तानला बसला आहे. यामुळे आयसीसी क्रमवारीत पाकिस्तानची घसरण झाली आहे.

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीनुसार भारतीय संघाने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या स्थानावर आहे. पाकिस्तानच्या संघाची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. पाकिस्तान संघाचे सध्या 3102 पॉइंट्स आणि 115 रेटिंग आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या टीम इंडियाचे 4516 पॉइंट्स आणि 116 रेटिंग गुण आहेत. पहिल्या स्थानावर असणाऱ्या ऑस्ट्रेलियाकडे 3061 पॉइंट्स आणि 118 रेटिंग गुण आहेत. इंग्लंडचा संघ चौथ्या तर न्यूझीलंड पाचव्या स्थानावर आहे.

Share This News

Related Post

T-20 WorldCup 2024

T-20 WorldCup 2024 : हार्दिक पांड्याला पर्याय म्हणून ‘या’ खेळाडूचा टी20 वर्ल्ड कपसाठी दावा; ईशान, श्रेयसची जागाही धोक्यात

Posted by - January 15, 2024 0
मुंबई : भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान तीन टी20 सामन्यांची मालिका (T-20 WorldCup 2024) खेळवली जात आहे. यातले पहिले दोन सामने जिंकत…
Rohit Sharma

Rohit Sharma : रोहित शर्मा मैदानात उतरताच करणार ‘हा’ मोठा विश्वविक्रम

Posted by - January 14, 2024 0
मुंबई : रोहितच्या चाहत्यांसाठी (Rohit Sharma) एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आज अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात रोहित मैदानावर उतरताच त्याच्या…
Ben Stokes

बेन स्टोक्सने टेस्टमध्ये रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कॅप्टन

Posted by - June 4, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंड (England) आणि आयर्लंड (Ireland) या दोन संघातील एकमेव कसोटी सामना शनिवारी पार पडला. हा…
Chandrayaan-3

Chandrayaan 3: भारतीयांसाठी ऐतिहासिक दिवस! कशी आहे आजची चांद्रयान-3 ची मोहीम?

Posted by - July 14, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आज दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील…
Stuart Broad Retirement

Stuart Broad Retirement : स्टुअर्ट ब्रॉडने Ashes सीरिजदरम्यान अचानक घेतली निवृत्ती

Posted by - July 30, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंड क्रिकेट टीमचा वेगवान आणि अनुभवी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने (Stuart Broad) निवृत्तीचा निर्णय जाहीर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *