Hockey Sports Tournament : जिल्हास्तरीय नेहरू हॉकी क्रीडा स्पर्धेचे आयोजन

211 0

पुणे : जिल्हास्तरीय नेहरू हॉकी क्रीडा स्पर्धेचे १० ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेसाठी १ ते ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या निर्देशानुसार २०२२-२३ या वर्षात राष्ट्रीय स्तरावरील नेहरू कप स्पर्धेचे आयोजन २ सप्टेंबर २०२२ पासून नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा तसेच विभागस्तरावरील स्पर्धेचे आयोजन १२ ऑगस्ट २०२२ पूर्वी करण्यात येणार आहे. २०२२-२३ या वर्षातील जिल्हास्तरावरील स्पर्धा १० ऑगस्टपासून सुरू होणार आहेत.

सब ज्युनियर गटासाठी जन्मतारिख १ नोव्हेंबर २००७ किंवा त्यानंतरची असावी. १७ वर्षे मुलांच्या व मुलींच्या ज्युनियर गटासाठी जन्मतारिख १ नोव्हेंबर २००५ किंवा त्यानंतरची असावी.

जिल्हास्तरावर पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात क्रीडा विभाग, पिंपरी चिंचवड मनपा, १५ प्रेमलोक पार्क चिंचवड येथे, पुणे महानगरपालिका व पुणे ग्रामीण क्षेत्रात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शास्त्रीनगर, येरवडा येथे १ ते ५ ऑगसट सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा स्तरावर पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासाठी क्रीडा अधिकारी अनिता केदारी-९३७०१७९६८४, पुणे महानगरपालिका क्षेत्रासाठी क्रीडा अधिकारी अतुल माने-९८२२९८६११२ तर पुणे ग्रामीणसाठी क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे-८८८८८७०८८० यांना स्पर्धेसंदर्भात संपर्क साधावा. जिल्हास्तरावर अधिकाधिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील संघांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही श्री. कसगावडे यांनी केले आहे.

Share This News

Related Post

पुणे महानगपालिकेचं 8,592 कोटींचं अंदाजपत्रक सादर

Posted by - March 7, 2022 0
पुणे महानगपालिकेचं 8,592 कोटीचं अंदाजपत्रक महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सादर केलं. यावेळी अंदाजपत्रकात पुणे शहरात नव्याने सहा उड्डाणपूल होणार…

मोठी बातमी! क्रिकेटर केदार जाधवच्या वडिलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश

Posted by - March 27, 2023 0
पुणे: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू केदार जाधवच्या वडिलांना शोधून काढण्यात अखेर पोलिसांना यश आले असून मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घोरपडीमध्ये…

दिलासादायक! खडकवासला धरणातील पाणीसाठा वाढला

Posted by - July 11, 2022 0
पुणे: शहरात व धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत पडल्यामुळे खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून गेल्या 24 तासात 0.80 टीएमसी पाणीसाठा…
marcus

Marcus Stoinis : मार्कस स्टॉयनिसची अविस्मरणीय खेळी! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

Posted by - April 24, 2024 0
चेन्नई : केएल राहुलच्या लखनऊ सुपर जायंटने चेन्नईला त्यांच्याच घरच्या मैदानावर चेपॉकवर पराभूत केले. चेन्नईकडून मिळालेल्या 211 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी…

पॅराग्लायडींग हॉट बलून उड्डाणांना बंदी ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Posted by - March 5, 2022 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 6 मार्च रोजी पुणे शहरात दौरा होणार आहे. त्या अनुषंगाने व्हीव्हीआयपी यांच्या दौऱ्यानिमित्त सुरक्षिततेसाठी पुणे शहर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *