Sushil Kumar

Sushil Kumar : ऑलिम्पिक चॅम्पियन सुशील कुमारचे तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण

590 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक पटकावून देणाऱ्या सुशील कुमारने (Sushil Kumar) दिल्लीतील तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केले आहे. सुशील कुमार (Sushil Kumar) याच्यावर ज्युनियर अ‍ॅथलीट सागर धनखरचा खून त्याचबरोबर हत्येचा प्रयत्न यासह दंगल आणि गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप आहे. गुडघ्याच्या ऑपरेशननंतर सुशील कुमार जामिनावर बाहेर होता. त्यानंतर आता त्याने पुन्हा स्वतःला तिहार जेलमध्ये सरेंडर केले आहे.

सागर धनखर हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी 170 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. यामध्ये सुशील कुमारला मुख्य आरोपी बनवण्यात आलं होतं. दिल्लीच्या रोहिणी कोर्टाने सुशील कुमारला 23 जुलै ते 30 जुलै या एका आठवड्यासाठी अंतरिम जामीन मंजूर केला होता. वैद्यकीय कारणास्तव सुशील कुमारला हा जामीन मंजूर करण्यात आला होता.

काय आहे नेमके प्रकरण?
2021 मध्ये दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगमध्ये ज्युनियर कुस्तीपटू सागर धनखरला बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत सागर धनखरचा मृत्यू झाला होता.या प्रकरणात सुशील कुमारला (Sushil Kumar) अटक करण्यात आली होती. या प्रकरणी सुशील कुमार आणि इतर 17 जणांविरुद्ध खून आणि गुन्हेगारी कटाचे आरोप करण्यात आले होते.

Share This News

Related Post

NIA

NIA कार्यालयावर दहशतवादी हल्ल्याची शक्यता; अलर्ट जारी

Posted by - May 8, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सतर्क केले आहे.…
Virat Kohli

कोहलीची ‘विराट’ कामगिरी! ‘हा’ विक्रम करणारा पहिला आशियाई व्यक्ती

Posted by - May 25, 2023 0
मुंबई : भारतीय क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली…
IND W vs BAN W

IND W vs BAN W: हरमनप्रीत कौरला संतप्तपणा नडला; ‘या’ दोन शिक्षानां सामोरे जावे लागणार

Posted by - July 23, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ही बांगलादेश विरुद्धच्या सामन्यानंतर (IND W vs BAN…
IND Vs AUS

Ind Vs Aus : मेगाफायनलला पावसाने घोळ घातल्यास विजेता कोण होणार? ICC चा नियम काय सांगतो?

Posted by - November 18, 2023 0
मुंबई : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (Ind Vs Aus) यांच्यातील फायनलची सगळे क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. उद्या रविवारी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *