oliverwhitehouse

क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विक्रम ! ‘या’ खेळाडूने घेतल्या एकाच षटकात 6 विकेट्स

728 0

क्रिकेट हा एक असा खेळ आहे ज्यात रोज नवनवीन रेकॉर्ड बनतात आणि मोडतात. कधी फलंदाज तर कधी गोलंदाज, कधी क्षेत्ररक्षणक. सध्या एक असा विक्रम समोर आला आहे. जो याआधी क्रिकेटच्या इतिहासात कधीच घडला नव्हता. यामध्ये एका ज्युनियर खेळाडूने असाच एक अशक्य वाटणारा पराक्रम क्रिकेटच्या मैदानावर केला आहे. त्याने 6 चेंडूत 6 विकेट्स घेतल्या आहेत. या विक्रमाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

कोण आहे तो खेळाडू?
क्रिकेटचा कोणताही फॉरमॅट असो, प्रत्येक गोलंदाजाला हॅटट्रिक करायची असते. कोणत्याही फॉरमॅटमध्ये हॅटट्रिक (Hattrick Wicket) घेणे दुर्मिळ आहे, परंतु एका 12 वर्षांच्या मुलाने एकदा नव्हे तर दोनदा ही कामगिरी केली आहे. या खेळाडूचे नाव आहे ऑलिव्हर व्हाईट हाऊस. ऑलिव्हरने एकाच षटकात दोनदा हॅट्रिक घेतली आहे. म्हणजे त्याने ओव्हरच्या प्रत्येक बॉलवर विकेट घेतली आहे.

ऑलिव्हर व्हाइट हाऊसने या महिन्यात कुकहिलविरुद्ध ‘ब्रॉम्सग्रोव्ह’ क्रिकेट क्लबकडून खेळताना हा पराक्रम केला. ऑलिव्हरने 6 चेंडूत प्रतिस्पर्धी संघाच्या 6 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. ऑलिव्हरने दोन षटकांत एकही धाव न देता तब्बल आठ विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे, ऑलिव्हरची आजी ‘अ‍ॅन जोन्स’ या 1969 ची विम्बल्डन टेनिस चॅम्पियन आहेत.

Share This News

Related Post

Rohit Sharma

World Cup 2023 : रोहित शर्माने रचला इतिहास; ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय फलंदाज

Posted by - October 23, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या भारतात वर्ल्डकप (World Cup 2023) सुरु आहे. यामध्ये टीम इंडिया चांगली कामगिरी करताना दिसत…

क्रिकेट विश्वावर शोककळा ! शेन वॉर्न याचे निधन

Posted by - March 4, 2022 0
क्रिकेटविश्वाला हादरवणारी एक बातमी समोर आली असून. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याचे निधन झाल्याचे वृत्त समोर येत आहे. वॉर्न…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *