Neeraj Chopra

Neeraj Chopra : नीरज चोप्राने एकाच भाल्यात साधले 2 लक्ष्य; वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलसह पटकावलं पॅरिस ऑलिम्पिकचं तिकिट

943 0

भारताचा गोल्डन बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये (World Athletics Championships) जबरदस्त खेळी केली आहे. नीरज चोप्राने मेन्स जॅव्हलिन थ्रो स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. नीरजने आपल्या पहिल्या प्रयत्नात 88.77 मीटर लांब भाला फेकत अंतिम सामन्यात आपली जागा पक्की केली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 27 ऑगस्टला पार पडणार आहे.

नीरज फायनलमध्ये धडक मारणारा पहिला एथलिट बनला. यासोबतच त्याने पॅरिस ऑलिम्पिकची पात्रताही मिळवली आहे. या हंगामातली त्याची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. तर एकूण कारकिर्दीतली तिसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. त्याने या स्पर्धेत पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर भालाफेक करत पहिलं स्थान पटकावलं. दुसऱ्या स्थानावर जर्मनीचा ज्युलियन वेबर आहे. तर भारताचा मनु डीपी तिसऱ्या स्थानी आहे.

Share This News

Related Post

Vijender Singh

Vijender Singh : बॉक्सर विजेंदर सिंगचा भाजपमध्ये प्रवेश

Posted by - April 3, 2024 0
आंतरराष्ट्रीय बॉक्सर विजेंदर सिंहने (Vijender Singh) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपाचे महासचिव विनोद तावडे यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये हा पक्षप्रवेश पार…
Ind Vs Eng 5th Test

Ind Vs Eng : टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा, 1 इनिंग आणि 64 धावांनी दणदणीत विजय

Posted by - March 9, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि इंग्लड (Ind Vs Eng) यांच्यात धर्मशालामध्ये सुरु असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताचा विजय…

महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिक वितरण ; महाराष्ट्र केसरी विजेता ठरला पैलवान शिवराज राक्षे

Posted by - January 14, 2023 0
पुणे : आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री…

अभिनेता आर माधवनच्या मुलाने पटकावले डॅनिश ओपन जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक

Posted by - April 18, 2022 0
मुंबई – अभिनेता आर. माधवनचा मुलगा वेदांत यानं डेन्मार्क येथील कोपहेगनमध्ये झालेल्या डॅनिश ओपन जलतरण स्पर्धा 2022 मध्ये सुवर्णपदक पटकावले…
World University Games

World University Games : 100 मीटर स्पर्धेत खेळाडूने काढली देशाची लाज; क्रीडा मंत्र्यांना मागावी लागली जाहीर माफी

Posted by - August 3, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्सचं (World University Games) आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेमध्ये (World University…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *