lasith-malinga

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, मलिंगा पुन्हा एकदा मुंबईकडून खेळणार

978 0

मुंबई : सध्या भारतात वर्ल्ड कप 2023 सुरु आहे. भारत यंदा वर्ल्ड कपचा प्रबळ दावेदार मानला जात असून त्याप्रमाणे आतापर्यंत भारतीय संघाने सर्व सामने जिंकले आहेत. अशातच आता आयपीएलमधील सर्वाधिक यशस्वी टीम असलेल्या मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. यॉर्कर किंग लसिथ मलिंगा पुन्हा एकदा मुंबईच्या संघाकडून खेळताना दिसणार आहे. मात्र यावेळी तो वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

लसिथ मलिंगा याला लॉटरी लागली असून त्याने मुंबई इंडियन्सला अनेक सामने एकहाती जिंकुन दिले आहेत. मलिंगाची मुंबई इंडियन्सच्या मुख्य गोलंदाजी प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. मुंबईच्या टीम मॅनेजमेंटने मलिंगाकडे आता गोलंदाजीची धुरा सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी निवड होण ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. मार्क बाऊचर आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे अशी प्रतिक्रिया लसिथ मलिंगा यांनी दिली आहे.

लसिथ मलिंगा आधी राजस्थान रॉयल्स संघामध्ये कोचिंगची जबाबदारी पाहत होता. मुंबईला मलिंगाने अनेक सामने जिंकले असून स्ट्राईक बॉलर म्हणून त्याने मुंबईच्या गोलंदाजीची धुरा सांभाळली होती. मुंबईकडून खेळताना प्रत्येक मोसमामध्ये मलिंगाने आपली जबाबदारी चोख पार पाडली. मलिंगाने मुंबईसाठी 139 सामने खेळले आणि 7.12 च्या इकॉनॉमीने 195 विकेट घेतल्या.

Share This News

Related Post

जगातील प्रत्येक क्रिकेटप्रेमी पर्यंत आयपीएल पोहोचवणे आमचे मिशन – नीता अंबानी

Posted by - June 17, 2022 0
नवी दिल्ली- आयपीएल सामन्यांच्या प्रसारण हक्कांसाठी लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली. यामध्ये वायकॉम18 ग्रुपने तीन गटाचे अधिकार जिंकले आहेत. या…
IND W Vs AUS W

IND W Vs AUS W : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

Posted by - December 25, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय महिला संघाची…
IND Vs AUS

IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी संघाची घोषणा; ‘हा’ खेळाडू करणार संघाचे नेतृत्व

Posted by - October 28, 2023 0
मुंबई : सध्या भारतात आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धा सुरु आहे. या वर्ल्डकपनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS) 5 सामन्याची…
Bajarang Punia

Bajarang Punia : साक्षी मलिकच्या निवृत्तीनंतर कुस्तीपटू बजरंग पुनियाने घेतला पद्मश्री परत करण्याचा निर्णय

Posted by - December 22, 2023 0
मुंबई : क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये भारताला ऑलिम्पिकमध्ये पदक (Bajarang Punia) जिंकवून देणाऱ्या कुस्तीपटू साक्षी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *