Team India

Asia Cup 2023: आशिया चषकापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का! ‘या’ दिग्गज खेळाडूने घेतली तडकाफडकी निवृत्ती

626 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय संघातील खेळाडू मनोज तिवारीने सर्व प्रकारच्या क्रिकेट प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. मनोज तिवारीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. त्याने आशिया चषकापूर्वी (Asia Cup 2023) ही निवृत्ती जाहीर केल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

https://twitter.com/tiwarymanoj/status/1686994882559385600

https://www.instagram.com/p/CveRzImttqR/?utm_source=ig_embed&ig_rid=a1ab0797-b998-43f5-be66-d385be48e99c

मनोजने भारताकडून 12 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 287 धावा केल्या. यामध्ये त्याने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले. त्याने 3 टी-20 सामनेही खेळले आहेत. त्याने 141 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 9908 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने त्रिशतकही ठोकले आहे. नाबाद 303 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. मनोजने या फॉरमॅटमध्ये 29 शतके आणि 45 अर्धशतके केली आहेत. त्याने लिस्ट ए च्या 169 सामन्यात 5581 धावा केल्या आहेत. यामध्ये 6 शतके आणि 40 अर्धशतके केली आहेत. मनोजने इंडियन प्रीमियर लीगमध्येही चांगली कामगिरी केली आहे. त्याने 98 IPL सामन्यात 1695 धावा केल्या आहेत. मनोजने जुलै 2015 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध भारतासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. आणि शेवटचा T20 सामना सप्टेंबर 2012 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता.

Share This News

Related Post

मोठी बातमी ! एनसीबीच्या कारवाईत कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त, दोघांना अटक

Posted by - May 27, 2022 0
मुंबई- मुंबईत दोन ठिकाणी छापे टाकून मुंबईच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज…

जेजुरीगडावर खंडेरायाच्या दर्शनाला येताय; तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी

Posted by - December 25, 2022 0
चीनसह अनेक देशांमध्ये कोरोनानं पुन्हा डोकं वर काढल्यानंतर संपूर्ण जगात सध्या घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र व…

सप्टेंबर राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार? विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या ‘या’ विधानानं राज्यात खळबळ

Posted by - August 19, 2023 0
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्रीपदावरून मोठा दावा करत असून आता सप्टेंबर महिन्यात मुख्य खुर्ची बदलेल असा दावा…
Pune News

Pune News : पुण्यातील मोहम्मद वाडीत मास्क घालून रिव्हॉल्व्हरने धमकावून ज्वेलरी शॉपमध्ये दरोडा;सीसीटीव्ही व्हिडीओ आला समोर

Posted by - May 18, 2024 0
पुणे : पुण्यातील (Pune News) वानवडी परिसराच्या हद्दीतील वाडकर मळा शेजारी असलेल्या सोनाराच्या दुकानात सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर…

पुण्यातील कात्रजमध्ये गोवा बनावटी मद्याची वाहतुक करतांना लग्झरी बससह विदेशी मद्यसाठा जप्त.

Posted by - October 7, 2023 0
मा. आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई डॉ. विजय सुर्यवंशी सो, मा. संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई सुनील चव्हाण यांच्या आदेशानुसार पुणे विभागाचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *