Breaking News
Maharashtra Kesari 2023

Maharashtra Kesari 2023 : अखेर ठरलं ! महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ‘या’ जिल्ह्यात पार पडणार

908 0

मुंबई : महाराष्ट्र केसरी स्पर्धेबाबत (Maharashtra Kesari 2023) मोठी बातमी समोर आली आहे.महाराष्ट्र केसरीच्या 65 वा स्पर्धेच्या थराराची तारीख आणि ठिकाण जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने यासंदर्भात घोषणा केली आहे. महाराष्ट्र केसरीचा थरार हा पाच दिवस चालणार आहे. यंदाच्या स्पर्धेचा मान हा धाराशिव या जिल्ह्याला मिळाला आहे. यंदा धाराशिवमध्ये केसरी स्पर्धेच आयोजन करण्यात आलं आहे.

कधी आणि कसे होणार सामने?
1 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर पाच दिवस ही स्पर्धा पार पडणार आहे. सर्व जिल्ह्यांमधून 450 खेळाडू माती आणि 450 खेळाडू गादी गटात असे 900 खेळाडू सहभागी होणार आहेत. माती आणि गादी असे 10 वेगवेगळे वजन असे 20 गटात ही स्पर्धा पार पडणार आहे. धाराशिव जिल्ह्याला पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनाचा मान मिळाला आहे. धाराशिवमधील तुळजाभवानी स्टेडियममध्ये ही स्पर्धा होणार आहे. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ आणि धाराशिव कुस्ती तालीम संघाकडून हे आयोजन करण्यात आला आहे.

जिंकणाऱ्याला काय मिळणार बक्षीस ?
महाराष्ट्र केसरीचा गदा जिंकणाऱ्या पैलवानाला चांदीची मानाची गदा वआणि 30 लाख रुपये किमतीची स्कर्पिओ गाडी मिळणार आहे. द्वितीय बक्षीस महिंद्रा ट्रॅक्टर मिळणार. तसेच 20 गटात स्पर्धा होणार असुन प्रत्येक गटातील प्रथमला बुलेट, रोख पारितोषिक उत्तेजनार्थ 12 लाख बक्षिसे देण्याता येणार आहेत. या स्पर्धेला राज्यातील अनेक नेते वेगवेगळ्या दिवशी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, 31 जूनला महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची सर्वसाधारण सभा झाली होती. या सभेत मानाच्या स्पर्धेचं आयोजन हे धाराविव जिल्ह्यात करावं अशी मागणी करण्यात आली होती. अखेर या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

Share This News

Related Post

ST

ST : एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार; महामंडळाने केली ‘ही’ मोठी घोषणा

Posted by - October 20, 2023 0
मुंबई : एसटी (ST) कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदाची दिवाळी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची जाणार आहे. सानुग्रह अनुदान…
RCB

RCB च्या संघात होणार मोठे बदल; 2024 पूर्वी ‘या’ दोन दिग्गजांना RCB करणार अलविदा

Posted by - July 17, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन प्रीमियर लीग 2024 पूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघामध्ये मोठे बदल पाहायला मिळणार आहेत.…
Mumbai Pune Highway

Mumbai -Pune Expressway : मुंबई -पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 6 तासांचा घेण्यात येणार मेगाब्लॉक

Posted by - January 17, 2024 0
पुणे: मुंबई पुणे एक्स्प्रेस वे (Mumbai -Pune Expressway) वरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या मार्गावर कॉरिडॉरचे…
MNS

MNS : अखेर ठरलं ! मनसे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात; राज्यात ‘एवढ्या’ जागा लढवणार

Posted by - October 13, 2023 0
मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मनसेनं (MNS) लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील 21…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *