Maharashtra Kesari 2023 : सिकंदर शेख ठरला 66 वा महाराष्ट्र केसरी

981 0

पुणे : कुस्तीच्या पंढरीत गंगावेस तालमीत मेहनत घेणाऱ्या सिंकदर शेखने अवघ्या साडे पाच सेकंदात ६६व्या महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. अंतिम फेरीच्या लढतीत सिकंदरने प्रतिस्पर्धी शिवराज राक्षेला ५.३७ सेकंदाला झोळी डावावर चितपट केले.

प्रदीपदादा कंद व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने 66 वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. फुलगाव येथील सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये स्पर्धा झाली.

अंतिम फेरीच्या लढतीत सिकंदरचे पारडे निश्चित जड होते. पण, शिवराज त्याला आव्हान देईल अशी अपेक्षा होती. मात्र, वेगवान आणि आक्रमक कुस्ती खेळणाऱ्या सिकंदरपुढे शिवराजचा निभाव लागला नाही. लढतीला सुरुवात झाल्यावर अवघ्या काही सेकंदात सिकंदरने झोळी डाव घेत शिवराजला उचलून खाली घेतले आणि त्याच स्थितीत शिवराजला चितपट करून विजेतेपदाचा मान मिळविला.

पारितोषिक वितरणप्रसंगी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, मुरलीधर मोहोळ, स्वागताध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे सदस्य प्रदीप कंद, कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, विलास कथुरे, योगेश दोडके यावेळी उपस्थित होते. विजेत्या सिकंदरला थार गाडी, गदा असे पारितोषिक देण्यात आले. उपविजेता शिवराज ट्रॅक्टरचा मानकरी ठरला.

त्यापूर्वी, माती विभागात झालेल्या अंतिम लढतीत पहिल्या फेरीतच सिकंदरने संदीपवर सातत्याने ताबा मिळवत सलग दोन गुणांचा सपाटा लावला आणि दहा गुणांची वसुली करत तांत्रिक वर्चतस्वावर विजय मिळवून किताबी लढतीत प्रवेश केला होता. गादी विभागात शिवराज राक्षेने कमालीचा चपळपणा दाखवत हर्षद कोकाटेचा तांत्रिक वर्चस्वावर पराभव करून अंतिम फेरी गाठली.

अन्य निकाल –
माती विभाग – ६५ किलो रोहन पाटील (कोल्हापूर) वि.वि. यश मगदूम (गडचिरोली), ७४ किलो -अनिल कचरे (पुणे) वि.वि. संदेश शिषमुळे (गडचिरोली) , ७० किलो – निखिल कदम (पुणे) वि.वि. अभिजित भोसले (सोलापूर), ६१ किलो – अमोल वालगुडे (पुणे जिल्हा) वि.वि. भालचंद्र कुंभ (पुणे), ५७ किलो – सौरभ इंगवे (सोलापूर) वि.वि. कृष्णा हरणावळ (पुणे), ८६ किलो – विजय डोईफोडे (सातारा) वि.वि. ओंकार जाधवराव (पुणे)

गादी विभाग ६१ किलो – पवन डोन्हर (नाशिक) वि.वि योगेश्वर तापकिर (पिंपरी चिंचवड), ७० किलो – विनायक गुरव (कोल्हापूर) वि. वि. संकेत पाटील (कोल्हापूर), ५७ किलो – आतिश तोडकर (बीड) वि.,वि. आकाश सलगर (सोलापूर). ७४ किलो – शुभम थोरात (पुणे ) वि.वि. राकेश तांबुलकर (कोल्हापूर)

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Related Post

Pune News : पुण्यात प्रसिद्ध बिल्डर्सच्या मुलाचा कारनामा; भरधाव कार चालवत दोघांना उडवलं

Posted by - May 19, 2024 0
पुणे : पुण्यात (Pune News) कल्याणीनगर भागात मध्यरात्री आलिशान कारने दुचाकीसह अनेक वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात…
Pune News

Pune News : पुणे रेल्वे जंक्शन यार्डमध्ये रेल्वे डब्याला भीषण आग

Posted by - February 13, 2024 0
पुणे : काल रात्री मध्यरात्रीच्या सुमारास पुणे रेल्वे जंक्शन (Pune News) येथे रेल्वेच्या डब्बयाला आग लागली होती. या आगीची माहिती…

ई-बाईक चार्ज करताना झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे शोरूम जळून भस्मसात ; 8 जणांचा होरपळून मृत्यू

Posted by - September 13, 2022 0
तेलंगणा : हैदराबाद मधील सिकंदराबाद येथे एका इलेक्ट्रिक बाइक शोरूम मध्ये मोठी आगीची घटना घडली आहे. फायर ब्रिगेडच्या दोन गाड्यांनी…
Virat Kohli

Virat Kohli : विराट कोहलीला ‘तो’ विश्वविक्रम करण्यासाठी फक्त 6 धावांची गरज

Posted by - January 17, 2024 0
मुंबई : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा आणि शेवटचा टी20 सामना (Virat Kohli) आज बंगळुरुमध्ये खेळवला जाणार आहे. या अगोदरचे…

पुणे : श्रीमंत बाजीराव पेशवे यांची 322 वी जयंती ! ब्राह्मण महासंघाच्यावतीने भव्य मिरवणूक

Posted by - August 18, 2022 0
पुणे : श्रीमंत बाजीराव पेशवे यांची 322 जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ब्राह्मण महासंघाच्यावतीने प्रभात थिएटर ते शनिवारवाडा अशी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *