kl-rahul-injury

केएल राहुलच्या जागी ‘या’ खेळाडूची वर्णी; कसोटीमध्ये झळकावळे आहे त्रिशतक

466 0

मुंबई : क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल याला मांडीला झालेल्या दुखापतीमुळे आयपीएल 16 व्या सिजनमधून माघार घ्यावी लागली आहे. हि दुखापत गंभीर असल्यामुळे त्याला कव्हर होण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे तो जून महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधूनदेखील बाहेर पडला आहे.त्यामुळे आयपीएलमध्ये लखनऊ आणि टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे केएल राहुलच्या जागी संघात कोणाला संधी द्यायची हा प्रश्न लखनऊच्या टीमसमोर होता. आता लखनऊच्या टीमने केएल राहुलची रिप्लेसमेंट जाहीर करत भारताच्या एका धडाकेबाज खेळाडूला संघात स्थान दिले आहे. हा खेळाडू दुसरा- तिसरा कोणी नसून करुण नायर आहे. या फलंदाजाने टीम इंडियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक ठोकले होते.

करुण नायर हा आयपीएल 2023 पार पडलेल्या लिलावात अनसोल्ड राहिला. मात्र आता केएल याच्या दुखापतीनंतर लखनऊ सुपर जायंट्स टीम मॅनेजमेंटने करुण नायर याच्यावर विश्वास दाखवत त्याला आपल्या टीममध्ये दाखल करून घेतले आहे. करुण हा आयपीएल 15 व्या सिजनमध्ये राजस्थान रॉयल्स टीमचा भाग होता. राजस्थानच्या टीमने करुणला 1 कोटी 40 लाख रुपये मोजून आपल्या गोटात घेतलं होतं. मात्र त्याच्या निराशाजनक कामगिरीमुळे त्याला रिलीज करण्यात आले होते.

https://www.instagram.com/p/Cr3p7XFBvfj/?utm_source=ig_embed&ig_rid=fd6d3d2b-2216-4cd7-96e4-e7264659e03e

करुण नायर याची आयपीएल कारकीर्द
करुण नायर याने आतापर्यंत एकूण 76 आयपीएल सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने 127.75 च्या स्ट्राईक रेटने 1 हजार 496 धावा केल्या आहेत. यामध्ये 10 अर्धशतकांचा समावेश आहे. करुणने या खेळीत 161 चौकार आणि 39 सिक्स ठोकले आहेत. 83 ही करुणची आयपीएलमधील सर्वाधिक धावसंख्या आहे.

लखनऊ सुपर जायंट्स संघ
कृणाल पंड्या, (कर्णधार), मनन वोहरा, क्विंटन डी कॉक, आयुष बडोनी, दीपक हुड्डा, कृष्णप्पा गौतम, करण शर्मा,कायले मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, आवेश खान, मार्क वुड, मयंक यादव, मोहसीन खान, रवी बिश्नोई, जयदेव उनाडकट,यश ठाकूर, रोमॅरियो शेफर्ड, निकोलस पूरन, अमित मिश्रा, डॅनियल सॅम्स, प्रेरक मंकड, स्वप्नील सिंग, नवीन उल हक, युधवीर सिंग आणि करुण नायर.

Share This News

Related Post

शिवम शेट्टी व पुनीत बालन ग्रुप यांच्यात सहकार्य करार

Posted by - October 23, 2022 0
पुणे :माउंट एव्हरेस्ट G2 तायक्वांदो स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा तरुण खेळाडू शिवम शेट्टी याच्या समवेत ‘पुनीत बालन ग्रुप’च्यावतीने सहकार्य करार…

#SPORTS : महिला कुस्तीपटूंसाठी आनंदाची बातमी; सांगलीत पहिल्या “महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे” चे आयोजन

Posted by - March 14, 2023 0
सांगली : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीनंतर महिला कुस्तीसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलाय. सांगलीमध्ये पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे…
Ravindra Jadeja

Ravindra Jadeja : अखेर जडेजा बनला क्रिकेटचा ‘थालापथी’; CSK ने केली मोठी घोषणा

Posted by - April 9, 2024 0
चेन्नई सुपर किंग्स कडून इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 22 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 7 विकेट्सने विजय मिळवला. एमए…

India vs England Semi-Finals : क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी; आजच्या सामन्यात खेळणारा ‘हा’ बॉलर जखमी

Posted by - November 10, 2022 0
India vs England Semi-Finals : आज सेमी फायनलमध्ये टीम इंडिया आणि टीम इंग्लंड यांच्यात लढत होणार आहे. आज दुपारी दीड…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *