KKR vs SRH

KKR vs SRH : IPL Final मध्ये कसे असेल हवामान? कोणत्या संघाचे पारडे राहणार जड?

586 0

मुंबई : आयपीएल 2024 स्पर्धेतील फायनलचा (KKR vs SRH) सामना सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. ही फायनल कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉक मैदानावर रंगणार आहे. या स्टेडियमवरील खेळपट्टी फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल आहे. दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत रंगणार यात काहीच शंका नाही.

कसे असेल फायनल सामन्याचे वातावरण
एक्युवेदरने दिलेल्या रिपोर्टनुसार केकेआर विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यावेळी सायंकाळी ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता कमी आहे. सायंकाळी तापमान 32 आणि 33 डिग्री सेल्सियस इतकं राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शनिवारी ज्या पद्धतीने पाऊस झाला आणि केकेआरचं सराव सत्र रद्द करावं लागलं तसं रविवारी झाल्यास काय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मात्र चाहत्यांसाठी आनंदाची बातमी असून फायनलवेळी पाऊस पडला तरी सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे. रविवारी सामना होऊ शकला नाही तर तो सोमवारी खेळवला जाईल.

कशी आहे दोन्ही संघाची एकमेकांविरोधातील कामगिरी
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात केकेआर आणि सनरायजर्स हैदराबाद तिसऱ्यांदा आमने-सामने येणार आहेत. याआधी दोन्ही लीग फेरीत दोनवेळा भिडले आहेत. दोन्ही वेळा केकेआरने सनरायजर्स हैदराबादला हरवलं. क्वालिफायर एक सामन्यात केकेआरने हैदराबादविरुद्ध 4 विकेट राखून विजय मिळवला. आता केकेआर तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक आहे तर हैदराबाद दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. त्यामुळे आता या दोन्ही संघात कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

IPL Final : IPL फायनलमध्ये ‘या’ 5 खेळाडूंच्या कामगिरीवर असणार सगळ्यांचे लक्ष

Pune Porsche Car Accident : पुणे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; ‘ते’ CCTV फुटेज लागले पोलिसांच्या हाती

Sanjay Raut : गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी प्रयत्न केले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Buldhana Accident : शिर्डीवरून परतणाऱ्या भाविकांच्या स्कॉर्पिओचा भीषण अपघात

Baby Care Center : दिल्ली हादरली ! बेबी केअर सेंटरला लागली भीषण आग; 7 नवजात बाळांचा मृत्यू

Cyclone Update : काही तासांमध्ये ताशी 110 ते 120 किमी वेगानं चक्रीवादळ धडकणार; महाराष्ट्राबाबत IMD ने दिला ‘हा’ इशारा

Share This News

Related Post

भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने सिंगापूरमध्ये जिंकले सुवर्णपदक

Posted by - February 25, 2022 0
सिंगापूर- ऑलिम्पिक पदक विजेती आणि भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने आज सिंगापूर वेटलिफ्टिंग इंटरनॅशनल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. या…
Maharashtra Weather Update

Weather Update : विदर्भाला अवकाळी पावसासह गारपिटीनं झोडपलं; ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

Posted by - March 18, 2024 0
मुंबई : आज हवामान विभागाकडून पावसाची आणि गारपिटीची शक्यता (Weather Update) वर्तवण्यात आली आहे. विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला…
Ankit Bawne

Ankit Bawne : क्रिकेटर अंकित बावणेचा ‘पुनीत बालन ग्रुप’शी सहकार्य करार

Posted by - August 5, 2023 0
पुणे : महाराष्ट्राचा धडाकेबाज फलंदाज अंकित बावणे (Ankit Bawne) आता ‘पुनीत बालन ग्रुप’शी जोडला गेला आहे. या दोघांमध्ये नुकताच सहकार्य…
New Zealand Team

World Cup 2023 : विश्वचषकासाठी न्यूझीलंडने संघाची अनोख्या पद्धतीने केली घोषणा; सर्वत्र होतंय कौतुक

Posted by - September 11, 2023 0
ऑक्टोबर महिन्यात आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला (World Cup 2023) सुरुवात होणार आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान भारतात ही स्पर्धा…
Ravichandran-Ashwin-and-Ravindra-Jadeja

IND vs ENG : आर अश्विन, रवींद्र जाडेजानं रचला इतिहास; अनिल कुंबळे- हरभजन सिंहचा ‘तो’ विक्रम मोडला

Posted by - January 25, 2024 0
भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात हैदराबाद येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीत भारताचा अनुभवी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *