IPL Final

IPL Final : IPL फायनलमध्ये ‘या’ 5 खेळाडूंच्या कामगिरीवर असणार सगळ्यांचे लक्ष

647 0

आयपीएल 2024 स्पर्धेतील फायनलचा (IPL Final) सामना सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. ही फायनल कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉक मैदानावर रंगणार आहे. या स्टेडियमवरील खेळपट्टी फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल आहे. दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत रंगणार यात काहीच शंका नाही. दरम्यान दोन्ही संघात 5 असे खेळाडू आहेत जे आपल्या संघाला ट्रॉफी जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावू शकतात. आता हे 5 खेळाडू कोण आहेत त्यांचबद्दल थोडक्यात जाणून घेऊया…

1) सुनील नरेन
कोलकाता नाईट रायडर्स संघाला आयपीएलची ट्रॉफी जिंकायची असेल तर सुनील नरेनवर मोठी जबाबदारी असणार आहे. संपूर्ण हंगामात त्याने गोलंदाजी आणि फलंदाजीने शानदार कामगिरी केली आहे. फलंदाजी करताना त्याने 13 सामन्यांमध्ये 482 धावा केल्या आहेत. यासह गोलंदाजीतही त्याची धार पाहायला मिळाली आहे. त्याने 13 सामन्यांमध्ये 13 गडी बाद केले आहेत. यादरम्यान त्याने शतकी खेळीही केली आहे.

2) अभिषेक शर्मा
सनरायझर्स हैदराबादला आयपीएलची ट्रॉफी जिंकायची असेल तर अभिषेक शर्माची बॅट तळपणं अतिशय गरजेचं आहे. आतापर्यंत त्याने फलंदाजीत आणि गोलंदाजीत शानदार कामगिरी केली आहे. मात्र गेल्या दोन सामन्यांमध्ये त्याला चांगली सुरुवात करून देता आलेली नाही. त्यामुळे फायनलच्या सामन्यात त्याच्यावर चांगली सुरुवात करून देण्याची मोठी जबाबदारी असणार आहे.

3) श्रेयस अय्यर
हैदराबादला पराभूत करायचं असेल तर श्रेयस अय्यरला फलंदाजीसह चांगला प्लान घेऊन मैदानात उतरावं लागणार आहे. मध्यक्रमात त्याला विकेट सांभाळून धावा कराव्या लागणार आहेत. त्यामुळे या सामन्यात जबाबदारी घेऊन खेळावं लागेल. त्याने या हंगामातील 14 सामन्यांमध्ये 345 धावा केल्या आहेत.

4) पॅट कमिन्स
सनरायझर्स हैदराबाद जर ही ट्रॉफी जिंकायची असेल कमिन्सला गोलंदाजीत चांगली कामगिरी करावी लागेल. कारण कर्णधार म्हणून तो उत्तम आहे. मात्र कोलकाता नाईट रायडर्स संघाला कमीत कमी धावांवर रोखण्यासाठी कमिन्सने विकेट्स काढून देणं अतिशय गरजेचं आहे.

5) हेनरिक क्लासेन
हैदराबादला जर मोठी धावसंख्या उभारायची असेल तर हेनरिक क्लासेनला मैदानावर टीचून फलंदाजी करावी लागेल. क्लासेनने आतापर्यंत खेळलेल्या 15 सामन्यांमध्ये 42 च्या सरासरीने 463 धावा केल्या आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध झालेल्या सामन्यातही त्याने महत्वपूर्ण खेळी केली होती.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Porsche Car Accident : पुणे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; ‘ते’ CCTV फुटेज लागले पोलिसांच्या हाती

Sanjay Raut : गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी प्रयत्न केले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Buldhana Accident : शिर्डीवरून परतणाऱ्या भाविकांच्या स्कॉर्पिओचा भीषण अपघात

Baby Care Center : दिल्ली हादरली ! बेबी केअर सेंटरला लागली भीषण आग; 7 नवजात बाळांचा मृत्यू

Cyclone Update : काही तासांमध्ये ताशी 110 ते 120 किमी वेगानं चक्रीवादळ धडकणार; महाराष्ट्राबाबत IMD ने दिला ‘हा’ इशारा

Share This News

Related Post

Stuart Broad Retirement

Stuart Broad Retirement : स्टुअर्ट ब्रॉडने Ashes सीरिजदरम्यान अचानक घेतली निवृत्ती

Posted by - July 30, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंड क्रिकेट टीमचा वेगवान आणि अनुभवी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने (Stuart Broad) निवृत्तीचा निर्णय जाहीर…
Rajkot Stadium

Rajkot Stadium : राजकोट स्टेडियमला ‘शाह’ यांचं नाव देण्यात येणार; ‘या’ दिवशी पार पडणार सोहळा

Posted by - February 7, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांची मालिका चांगलीच रंगतदार ठरतेय. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने टीम…
Hardik Pandya

Hardik Pandya : भारताला मोठा धक्का! हार्दिक पंड्या उर्वरित वर्ल्डकपमधून बाहेर; ‘या’ खेळाडूची होणार संघात एंट्री

Posted by - November 4, 2023 0
मुंबई : भारतीय संघ उद्या म्हणजेच 5 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. मात्र या सामन्याअगोदर टीम इंडियाला मोठा धक्का…
Bajarang Punia

Bajrang Punia : बजरंग पुनियाचे निलंबन; उत्तेजक सेवन चाचणीस नकार दिल्याने केली कारवाई

Posted by - May 10, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तेजक सेवन चाचणीस नकार दिल्यामुळे राष्ट्रीय उत्तेजक संस्थेकडून (नाडा) केलेल्या तात्पुरत्या निलंबनाच्या कारवाईपुढे एक पाऊल…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *