jofra archer

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का ! जोफ्रा आर्चर IPLमधून बाहेर; तर ‘या’ खेळाडूची झाली एंट्री

1760 0

मुंबई : यंदाच्या आय़पीएलमध्ये (IPL) मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians)आपल्या फॉर्मला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. एकीकडे कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma) फॉर्म तर दुसरीकडे खेळाडूंची दुखापत मुंबईची डोकेदुखी ठरत आहे. मुंबईचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे IPLमधून बाहेर पडला. त्यामुळे जोफ्रा आर्चरवर (Jofra Archer) वेगवान गोलंदाजीची मदार होती. मात्र त्याला आपल्या फॉर्मला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे मुंबईने एक मोठा निर्णय घेत जोफ्रा आर्चरच्या जागी ख्रिस जॉर्डनला (Chris Jordan) आपल्या संघात दाखल करून घेतले आहे

ख्रिस जॉर्डनने 2016 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून आतापर्यंत त्याला एकूण 28 सामन्यात संधी मिळाली त्यामध्ये त्याने 27 विकेट्स घेतल्या. डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट अशी जॉर्डनची ओळख आहे. मुंबई इंडियन्सने जॉर्डनला 2 कोटी रुपये मोजून संघात घेतलं आहे. आधीपासूनच जॉर्डन मुंबई इंडियन्सच्या संघासोबत होता. पण अधिकृतपणे त्याची घोषणा करण्यात आली नव्हती. आता मुंबई इंडियन्सने अधिकृत माहिती दिली आहे.

बँगलोरविरुद्ध करो वा मरोचा सामना
मुंबई इंडियन्सचा आज रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Bangalore) विरुद्ध सामना आहे. वानखेडे स्टेडियमवर ही मॅच होणार आहे. दोन्ही टीम्ससाठी ही मॅच महत्वाची आहे. कारण आजच्या सामन्यात जो जिंकेल, तो पॉइंट्स टेबलमध्ये थेट तिसऱ्या नंबरवर जाईल. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 10 पैकी 5 सामने जिंकले आहेत तर 5 सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. आजचा बँगलोर विरुद्धचा सामना मुंबई इंडियन्ससाठी ‘करो या मरो’ मुकाबला आहे.

Share This News

Related Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर; ‘हे’ आहे कारण

Posted by - April 24, 2022 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर येणार आहेत गानकोकिळा लता…

पुण्यासह “या” ठिकाणी सरकार सुरू करणार हेरिटेज वॉक – अजित पवार

Posted by - March 11, 2022 0
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होत असून या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत तर अर्थराज्यमंत्री…
Anurag Thakur

Asian Games : चीनने भारताच्या ‘या’ 3 खेळाडूंवर बंदी घातल्याने अनुराग ठाकूर यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - September 22, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांपासून अरूणाचल प्रदेशच्या मुद्द्यावरून चीन भारताला वारंवार डिवचताना दिसत आहे, यामुळे भारत आणि…
Sharad Pawar And Jayant Patil

Ajit Pawar : अजित पवारांचं समर्थन भोवलं; ‘या’ मोठ्या नेत्यावर राष्ट्रवादीकडून कारवाई

Posted by - July 4, 2023 0
नागपूर : अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्या काही समर्थक आमदारांसह राष्ट्रवादीमधून बंड केल्यामुळे पक्षात मोठी फूट पडली आहे. यामुळे आता…
heavy Rain

Loksabha : नेत्यांच्या प्रचार सभांवर अवकाळी पावसाचं संकट; ‘या’ नेत्यांच्या सभा झाल्या रद्द

Posted by - May 10, 2024 0
पुणे : गेल्या काही दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने आज बऱ्याच ठिकाणी हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसाचा फटका नेत्यांच्या प्रचार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *