IPL Auction 2024

IPL Auction 2024 : आयपीएल 2024च्या लिलावाला सुरुवात LIVE

618 0

मुंबई : आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी आज दुबईत खेळाडूंचा लिलाव (IPL Auction 2024) पार पडत आहे. या लिलावात सर्व फ्रँचाइजींकडे मिळून 263 कोटी रुपये आहेत. यंदा पहिल्यांदाच परदेशात आयपीएल लिलाव होत आहे.दुबईतील कोका कोला एरिनामध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी एक वाजता लिलावाला सुरुवात झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या खेळाडूवर किती बोली लागली..

1) रोवमन पॉवेल (वेस्ट इंडिज) या खेळाडूसाठी राजस्थान रॉयल्स आणि केकेआर यांच्यात चढाओढ सुरू होती. 1 कोटी बेस प्राइज असलेल्या रोवमन पॉवेलला राजस्थान रॉयल्सने 7.40 कोटीं रुपये मोजून आपल्या ताफ्यात सामावून घेतले.

2) हॅरी ब्रूक (इंग्लड) या राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चुरस रंगली होती. अखेर दिल्ली कॅपिटल्सने 4 कोटी रुपये मोजून आपल्या संघात सामावून घेतले.

3) ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया) वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ट्रॅव्हिस हेडसाठी चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात चुरस रंगली होती. यामध्ये अखेर सनरायजर्स हैदराबादने बाजी मारत 6 कोटी 80 लाख रुपये मोजून त्याला आपल्या ताफ्यात सामावून घेतले.

4) राचिन रविंद्र (न्यूझीलंड) न्यूझीलंडचा युवा फलंदाज राचिन रविंद्रला 1.80 कोटी रुपयांना चेन्नई सुपर किंग्जने खरेदी केले.

5) लॉर्ड शार्दुल ठाकुर (भारत) शार्दुल ठाकुरसाठी चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात चढाओढ सुरू होती. यामध्ये चेन्नईने बाजी मारत त्याला आपल्या ताफ्यात घेतले. शार्दुल ठाकुरसाठी चेन्नईने 4 कोटी मोजले.

6) पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्सला हैदराबाद सनरायर्सने 20 कोटी 50 लाखांना विकत घेतलं आयपीएलच्या इतिहासातला तो सर्वात महागडा खेळाडू ठरला.

7) हर्षल पटेल (भारत) – आयपीएल लिलावात हर्षल पटेलला पंजाब किंग्जने 11.75 कोटींना घेतले आहे.

8) डेरिल मिशेल (न्यूझीलंड) – न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटर डेरिल मिशेलसाठी पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चढाओढ सुरू होती. त्यात 12 कोटी रुपयांपर्यंत बोली जाताच चेन्नई सुपर किंग्जने उडी घेतली. शेवटी 14कोटी रुपयांना चेन्नई सुपर किंग्ज संघाने डेरिल मिशेलला आपल्या ताफ्यात सामावून घेतले.

9) गेराल्ड कोएत्जी (दक्षिण आफ्रिका) – गेराल्ड कोएत्जी या खेळाडूला 5 कोटीची बोली लावून मुंबईने आपल्या संघात घेतले.

10) ख्रिस वोक्स (इंग्लंड) – ख्रिस वोक्स 4.2 कोटीची बोली लावून पंजाबने आपल्या संघात घेतले.

11) हसरंगा (श्रीलंका ) हसरंगावर 1.5 कोटीची बोली लावून सनरायजर्स हैदराबादने आपल्या ताफ्यात सामावून घेतले.

12) अल्झारी जोसेफ (वेस्ट इंडिज ) अल्झारी जोसेफवर 11.5 कोटीची बोली लावून RCB ने आपल्या संघात दाखल केले.

13) उमेश यादव ( भारत) उमेश यादववर 5.8 गुजरातने त्याला आपल्या ताफ्यात सामावून घेतले.

14) शिवम मावी (भारत) शिवम मावीसाठी बंगळुरू आणि लखनऊच्या संघांनी बोली लावली. यामध्ये लखनऊच्या संघांने बाजी मारत 6.40 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात घेतले.

15) मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) – मुंबई आणि दिल्लीमागोमाग कोलकात्याच्या संघाकडूनही स्टार्कसाठी बोली लावण्यात आली. मोठ्या संघांकडून त्याच्यावर लावण्यात आलेल्या बोलीचा आकडा 20 कोटींच्या पलिकडे गेला आणि सरतेशेवटी सर्वाधिक 24.75 कोटी इतकी मोठी रक्कम मोजत कोलकाताच्या संघाने त्याला आपल्या संघात घेतले.

16) जयदेव उनाडकट (भारत) जयदेव उनाडकटवर दिल्ली आणि हैदराबादच्या संघांकडून बोली लावण्यात आली. यामध्ये दिल्लीने बाजी मारत 1.6 कोटींची बोली लावत त्याला आपल्या संघात घेतले.

17) दिलशान मधुशंका (श्रीलंका) – श्रीलंकेचा बॉलर दिलशान मधुशंकावर मुंबई इंडियन्सने 4.60 कोटी रुपयांची बोली लावून आपल्या संघात घेतले.

18) शाहरुख खान (भारत) – शाहरुख खानला गुजरात टायटन्सने 7.40 कोटी मोजून संघात सामील करून घेतले.

19) समीर रिझवी (भारत) – समीर रिझवी याला चेन्नईने तब्बल 8.4 कोटींना खरेदी केलं आहे. येत्या हंगामात समीर रिझवी चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळणार आहे. विशेष म्हणजे समीर रिझवी हा भारताचा अनकॅप खेळाडू आहे.

20) कुमार कुशाग्र (भारत) – कुमार कुशाग्र या अनकॅप खेळाडूला दिल्ली कॅपिटल्सने करारबद्ध केलं आहे. कुमारची मूळ किंमत 20 लाख होती. दिल्ली कॅपिटल्सने त्याला 7.2 कोटींची किंमत मोजली आहे.

21) यश दयाल (भारत) – यश दयालला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 5 कोटींना विकत घेतलंय. यश दयाल गेल्या मोसमात गुजरात टायटन्सच्या संघाचा भाग होता.

अनसोल्ड खेळाडू
1 रिले रोसो – (दक्षिण आफ्रिका) – मूळ किंमत रु 2 कोटी
2 करुण नायर (भारत) – मूळ किंमत 50 लाख रुपये
3 स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) – मूळ किंमत रु 2 कोटी
4 मनीष पांडे (भारत) – मूळ किंमत 50 लाख रुपये

 

(अपडेटसाठी पेज रिफ्रेश करत रहा)

Share This News

Related Post

SPORTS : राज्यभरात आठ ठिकाणी रंगणार ‘महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा’

Posted by - January 2, 2023 0
SPORTS : आजपासून महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. 2 ते 12 जानेवारी या कालावधीत राज्यभरात 8 ठिकाणी ही स्पर्धा…
Team India

Cricket World Cup : भारतीय क्रिकेट संघ 2024 मध्ये 3 वर्ल्डकप खेळणार

Posted by - December 31, 2023 0
मुंबई : यंदा 2023 साली भारतात खेळल्या गेलेल्या ICC एकदिवसीय वर्ल्डकप फायनलमध्ये टीम इंडियाच्या पराभवातून भारतीय चाहते अजूनही सावरले नाहीत.…
IND W vs BAN W

IND W vs BAN W: हरमनप्रीत कौरला संतप्तपणा नडला; ‘या’ दोन शिक्षानां सामोरे जावे लागणार

Posted by - July 23, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ही बांगलादेश विरुद्धच्या सामन्यानंतर (IND W vs BAN…
Team India Jersey

Team India Jersey : भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी बोर्डाचा मोठा निर्णय; टीम इंडियाच्या जर्सीत बदल

Posted by - September 10, 2023 0
आज 10 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. अशातच या सामन्यापूर्वी बीसीसीआयने एक मोठा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *