IPL 2024

IPL 2024 : ‘सनरायझर्स’च्या कर्णधारपदी ‘या’ खेळाडूची वर्णी

449 0

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या 17 व्या हंगामाला 22 मार्चपासून (IPL 2024) सुरु होणार आहे. हे पर्व सुरु होण्याअगोदर सनरायझर्स हैदराबादच्या संघाने मोठी घोषणा केली आहे. सनरायझर्स हैदराबादच्या संघाने आयपीएल 2024 साठीचा नवा कर्णधार जाहीर केला आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमधील कर्णधार पॅट कमिन्सकडे सनरायझर्स’च्या संघाने कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे.

काय आहे ट्विटमध्ये?
सनरायझर्स हैदराबादच्या संघाने ट्वीटरवरुन ही घोषणा केली आहे. “ऑरेंज आर्मी, आयपीएल 2024 साठी आपला नवीन कर्णधार पॅट कमिन्स”, अशा कॅप्शनसहीत फोटो शेअर केला आहे. कमिन्सने दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करमची जागा घेतली आहे. कमिन्स हा सनरायझर्स हैदराबादचा 10 वा कर्णधार असणार आहे.

पॅट कमिन्सची आंतरराष्ट्रीय आणि IPL कारकीर्द
कमिन्ससाठी सनरायझर्स हैदराबादने तब्बल 20.5 कोटी रुपये यंदाच्या आयपीएल लिलावात खर्च केले आहेत. कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने 2023 मध्ये आयसीसीच्या दोन स्पर्धा जिंकल्या. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप आणि एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपची स्पर्धा ऑस्ट्रेलियाने कमिन्सच्या नेतृत्वाखालीच जिंकली. दोन्ही स्पर्धांच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला आहे. पॅट कमिन्स हा उत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. 2023 मध्ये कमिन्स एकूण 24 सामने खेळाला. त्याने यात 422 धावा केल्या आणि 59 विकेट्स घेतल्या होत्या.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sangharshyoddha Manoj Jarange Patil Teaser : ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील चित्रपटाचा धमाकेदार टीजर प्रदर्शित!

Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय ! आमदार, खासदारांनी लाच घेऊन सभागृहात भाषण किंवा मत दिल्यास त्यांच्यावर खटला चालवणार

Rinku Rajguru : सैराट फेम रिंकू राजगुरुला धक्काबुक्की; Video आला समोर

Pune Traffic Diversion : वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उद्यापासून पुण्यात अवजड वाहनांना बंदी

Latur Accident : लातूर-नांदेड महामार्गावर कारचा भीषण अपघात; देवदर्शनासाठी निघालेल्या 4 जणांचा मृत्यू

Road Accident : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडाच्या गाडीचा भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Dhanurasana : धनुरासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

T- 20 World Cup

T- 20 World Cup : टी- 20 वर्ल्ड कपसाठी ‘या’ 5 विकेटकिपर खेळाडूंनी सिद्ध केली दावेदारी

Posted by - April 17, 2024 0
देशात सध्या इंडियन प्रीमिअर लीगची धूम सुरु आहे. 22 मार्च पासून या सिरीजला सुरुवात झाली असून 26 मे रोजी आयपीएलचा…

ऑलम्पिक क्रीडा प्रशिक्षणासाठी ‘पुनीत बालन ग्रुप’चा पुढाकार

Posted by - May 1, 2023 0
पुणे : ऑलम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताला अधिकाधिक पदके मिळावीत यासाठी आता ‘पुनीत बालन ग्रुप’ने आणखी एक पाऊल टाकले आहे. ऑलम्पिक…
Ben Stokes

Ben Stokes : बेन स्टोक्सने ‘या’ कारणामुळे निवृत्ती घेतली मागे

Posted by - August 16, 2023 0
नवी दिल्ली : भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी इंग्लंडचा संघ सज्ज झाला आहे. इग्लंड व्यवस्थापकांच्या विनंतीनंतर अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) याने…

दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; पुनित बालन ग्रुप, पुना क्लब संघांची विजयी सलामी

Posted by - November 17, 2022 0
पुणे : बालन ग्रुप तर्फे आयोजित दुसर्‍या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत पुनित बालन ग्रुप आणि पुना…
Neeraj Chopra

Neeraj Chopra : वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये नीरज चोप्राने रचला इतिहास ! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय एथलिट

Posted by - August 28, 2023 0
भारताच्या नीरज चोप्राने (Neeraj Chopra) अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. नीरजने (Neeraj Chopra) पहिला थ्रो फाऊल…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *