Rohit Sharma

IPL 2024 : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का ! रोहित शर्माच्या ‘या’ हुकमी एक्क्याला झाला ‘तो’ आजार

605 0

मुंबई : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या टी-ट्वेंटी मालिकेसाठी (IPL 2024) काल टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. या मालिकेत संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव याच्याकडे जाईल, अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र, रोहितवर ही जबाबदारी सोपवण्यात आली. सूर्याला या संघात स्थान देण्यात आलेले नाही. या मालिकेत सूर्याला संधी का मिळाली नाही? याचे कारण आता समोर आले आहे.

सूर्याला झाला ‘हा’ आजार
सूर्यकुमार यादव याला स्पोर्ट्स हार्निया झाल्याची माहिती समोर आलीये. सध्या सूर्या बंगळुरूमधल्या एनसीएमध्ये असून लवकरच तो जर्मनीमध्ये उपचारासाठी जाणार आहे. येत्या दोन-तीन दिवसांत तो ऑपरेशनसाठी जर्मनीतील म्युनिकला जाणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या सुत्रांनी दिली आहे. त्यानंतर मात्र तो विश्रांती घेण्याची शक्यता आहे. अशातच आता सूर्याच्या या दुखापतीमुळे तो यंदाची आयपीएल सामने देखील मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे.

स्पोटर्स हार्निया म्हणजे काय?
स्पोर्ट्स हर्नियाला ऍथलेटिक पबल्जिया, स्पोर्ट्समॅन्स हर्निया आणि गिलमोर ग्रोइन असे देखील म्हणतात. यामध्ये दुखापतीमुळे मज्जातंतूचा त्रास होऊ शकतो. त्या भागात वेदना आणि संवेदनशीलता देखील वाढतो. अचानक पळण्याची दिशा बदलणे किंवा वेगाने वळणे यामुळे स्पोर्ट्स हर्निया होण्याची शक्यता असते.

मुंबई इंडियन्सचा संघ : आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, हार्दिक पांड्या, डेवाल्ड ब्रेविस, इशान किशन, जेसन बेहरेनडॉर्फ, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय सिंग, एन. तिलक वर्मा, नेहल वढेरा, पियुष चावला, रोहित शर्मा, रोमॅरियो शेफर्ड, शम्स मुलानी, सूर्यकुमार यादव , टीम डेव्हिड , विष्णू विनोद.

नवे खेळाडू : जेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pandharpur News : धक्कादायक! तक्रार मागे घेत नाही म्हणून आरोपींनी दलित शेतकऱ्याला दिली ‘ही’ भयंकर शिक्षा

Supriya Sule : बारामती लोकसभा मतदार संघातील भजनी मंडळांसाठी भजन आणि अभंग स्पर्धेची पर्वणी

University of Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकपाल पदी निवृत्त न्यायाधीश श्रीकृष्ण पानसे यांची नियुक्ती

Bilkis Bano Gangrape : बिलकिस बानो गँगरेप प्रकरणातील दोषींना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; शिक्षेतील सूट केली रद्द

Accident News : हिंगोलीमध्ये प्रवाशांनी भरलेल्या एसटीचा भीषण अपघात

Ashutosh Gowariker : मराठवाडा हे चित्रपटांचे सक्षम केंद्र बनेल : आशुतोष गोवारीकर

Talathi Bharti : तलाठी भरती संदर्भात मोठा घोटाळा समोर ! उमेदवाराला 200 मार्काच्या पेपरमध्ये 214 गुण मिळाले

Freedom of Information : माहिती अधिकार कट्ट्याचा 10 वा वर्धापन दिन साजरा

Share This News

Related Post

WC Final

WC Final: भारत ऑस्ट्रेलियाचा ‘तो’ रेकॉर्ड मोडणार? आजपर्यंत कोणालाच जमला नाही

Posted by - November 19, 2023 0
अहमदाबाद : विश्वचषक 2023च्या अंतिम सामन्याला (WC Final) काही वेळात सुरुवात होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात हा सामना खेळवण्यात…
IPL

IPLची टायटल स्पॉन्सरशिप टाटाकडेच; 5 वर्षांसाठी मोजले ‘एवढे’ कोटी

Posted by - January 20, 2024 0
मुंबई : बीसीसीआयने आयपीएलच्या (IPL) टायटल स्पॉन्सरशिपसाठी टेंडर जारी केलं होतं. यासाठी आदित्य बिर्ला ग्रुपने मोठी बोली लावली होती यामध्ये…

भविष्यात ऑलिम्पिक खेळ भारतात आणण्याचे आमचे स्वप्न- नीता अंबानी

Posted by - February 19, 2022 0
मुंबई- भविष्यात युवा ऑलिम्पिक आणि ऑलिम्पिक खेळ भारतात आणण्याचे आमचे स्वप्न आहे. जगातील सर्वात तरुण देश असलेल्या भारतातील तरुणांना ऑलिम्पिकची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *