Sarfaraz Khan And Dhruv Jurel

BCCI : आयपीएलआधी सर्फराज खान आणि ध्रुव जुरेलला लागली लॉटरी; BCCI ने दिले ‘हे’ मोठे गिफ्ट

604 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या सतराव्या हंगामाला येत्या 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन संघामध्ये या सीझनचा पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. मात्र हा सिझन सुरु होण्यापूर्वीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाच्या दोन युवा स्टार खेळाडूंना मोठं गिफ्ट दिलं आहे. बीसीसीआयने सर्फराज खान आणि ध्रुव जुरेलचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट्मध्ये समावेश केला आहे. बीसीसीआयच्या अपेक्स काऊन्सिलच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. त्यांचा ग्रेड-सी मध्ये समावेश करण्याता आला आहे.

बीसीसीआयची सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट यादी (ऑक्टोबर 2023 ते सप्टेंबर 2024)
ग्रेड ए+
रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा.

ग्रेड ए
आर अश्विन, मो. शमी, मो. सिराज, केएल राहुल, शुभमन गिल आणि हार्दिक पंड्या.

ग्रेड बी
सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जायसवाल.

ग्रेड सी
रिंकू सिंह, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकुर, शिवम दुबे, रवि बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सैमसन, अर्शदीप सिंह, केएस भरत, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, रजत पाटीदार, सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल.

सेंट्रल कॉन्ट्रेक्टमध्ये खेळाडूंना किती पैसे मिळतात
ग्रेड A+ – 7 कोटी रुपये प्रती वर्ष
ग्रेड A – 5 कोटी रुपये प्रती वर्ष
ग्रेड B – 3 कोटी रुपये प्रती वर्ष
ग्रेड C – 1 कोटी रुपये प्रती वर्ष

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Vasant More : मी तेव्हाच मनसे सोडणार होतो: वसंत मोरेंनी केला मोठा गौप्यस्फोट

Pune News : आगामी काळात रा.स्व. संघ ‘पंच परिवर्तन’ सूत्रावर आधारित काम करणार प्रांत संघचालक प्रा. सुरेश जाधव

Pune Crime News : मुलीवरून 2 मित्रांमध्ये झाला वाद; गैरसमजातून मित्राने उचलले ‘हे’ पाऊल

Kolhapur Crime News : कोल्हापूरमध्ये 2 गटांमध्ये तुफान राडा; पोलिसांसमोरच केली दगडफेक

Dandasana : दंडासन म्हणजे काय ? त्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Related Post

Ashutosh Sharma

Ashutosh Sharma : युवराज सिंहचा ‘तो’ विक्रम मोडणारा आशुतोष शर्मा यंदाच्या IPL मध्ये झळकला

Posted by - April 5, 2024 0
आशुतोष शर्माने (Ashutosh Sharma) पंजाब किंग्सला गुजरात टायटन्सविरुद्ध विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. IPL 2024 च्या 17 व्या…

State level cycle competition : ग्रामीण भागातून गुणवत्तापूर्ण खेळाडू घडणे आवश्यक : दिलीप वळसे-पाटील

Posted by - July 23, 2022 0
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार वाडा येथे…

सांगलीची प्रतीक्षा बागडी ठरली पहिली महिला महाराष्ट्र केसरी

Posted by - March 24, 2023 0
सांगली: यावर्षी सांगलीमध्ये पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. सांगलीची प्रतीक्षा बागडी ही पहिली महिला महाराष्ट्र केसरी…
Ankit Bawne

Ankit Bawne : क्रिकेटर अंकित बावणेचा ‘पुनीत बालन ग्रुप’शी सहकार्य करार

Posted by - August 5, 2023 0
पुणे : महाराष्ट्राचा धडाकेबाज फलंदाज अंकित बावणे (Ankit Bawne) आता ‘पुनीत बालन ग्रुप’शी जोडला गेला आहे. या दोघांमध्ये नुकताच सहकार्य…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *